Olive Ridley  dainikgomantak
गोवा

Olive Ridley: किनाऱ्यावर पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे, गाड्यांमुळे कासवे परत गेली? वागातोरला 'टर्टल नेस्टिंग साईट'ची गरज

Vagator Beach Olive Ridley Turtles: कासवे ज्या ठिकाणी अंडी घालण्यासाठी येतात त्याच ठिकाणी ती दरवर्षी पुन्हा येत राहतात. ती एक निसर्ग व्यवस्था आहे.

Sameer Panditrao

Vagator Beach Olive Ridley Turtles

वागातोर समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रीडली कासवे अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची संख्या वाढलेली आहे. गेल्या वर्षी सुमारे 17-18 कासवांनी या जागेत आपली जवळपास  २००० अंडी घातली होती.

कासवानी इथं घातलेल्या अंड्यांचे स्थलांतर वन खात्याकडून मोरजी येथील  समुद्रकिनाऱ्यावर कासव केंद्रात केले जाते. पण खरे तर जिथं कासवे अंडी घालतात तेच त्यांचे केंद्र बनले पाहिजे. कासवे ज्या ठिकाणी अंडी घालण्यासाठी येतात त्याच ठिकाणी ती दरवर्षी पुन्हा येत राहतात. ती एक निसर्ग व्यवस्था आहे. त्यामुळे अन्य किनाऱ्यावर कासवांनी घातलेल्या अंड्यांचे स्थलांतर न करता त्याच किनाऱ्यावर ती अंडी उबवली गेली पाहिजेत. 

वागातोर किनाऱ्यावर यंदा डिसेंबरपासून जवळजवळ 12 कासवे अंडी घालण्यासाठी आली होती परंतु तिथं अंडी न घालता ती परत गेली.‌ याचे कारण काय आहे हे ठाऊक नाही. कदाचित या किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी चालणाऱ्या पर्यटकांच्या पार्ट्यांमुळे आणि इथे येणाऱ्या गाड्यांमुळे त्यांना अडथळा निर्माण झाला असेल. पण त्यानंतर सुमारे 7-8 कासवानी येथे येऊन अंडी घातलेली आहेत. जवळपास 450 अंडी सध्या या किनाऱ्यावरील घरट्यांमध्ये आहेत. कासवांच्या इथे येऊन अंडी घालण्याच्या सातत्यामुळे हा किनारा देखील कासवांच्या घरट्यांसाठी एक केंद्र बनले पाहिजे. हा किनारादेखील मोरजी किनाऱ्याप्रमाणेच टर्टल नेस्टिंग साईट बनायला हवा. 

हा समुद्र किनारा जर असाच सुंदर राहायचा असेल आणि त्याला विविध मानवी प्रदूषणापासून दूर ठेवायचे असेल तर कासवांच्या घरट्यांचे केंद्र बनल्याने ते साध्य होऊ शकते. ‘पृथ्वी कासवाच्या पाठीवर वसलेली आहे’, या धार्मिक संकल्पनेचा अर्थ कदाचित तोच असू शकतो. जो आम्हाला संरक्षण देतो त्याचे संरक्षण करणे हे आमचेही काम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT