फार्मसी दिन कार्यक्रम प्रसंगी मान्यवर  Dainik Gomantak
गोवा

Vaccination: गोव्यातील लसीकरण होणार 45 दिवसात पूर्ण

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे जागतीक फार्मसी दिन या कार्यक्रमात प्रतिपादन

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोरोना नियंत्रणात येत असून दोन्ही डोसाचे लसीकरण येत्या महिन्या दिड महिन्यात पुर्ण होईल. मोफत आरोग्य उपचार करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. दिल्लीतील (Delhi)नेत्यांनी गोव्यात येऊन बढाया मारु नयेत. कारण गोव्यात दिल्लीपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा आहेत. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Health Minister Vishwajeet Rane)यांनी आज केले. भारतीय फार्मासुटीकल संघटनेच्या (IPA) गोवा शाखेद्वारे अन्न व औषधे प्रशासनालय (Food and Drug Administration)गोवा व फार्मासी महाविद्यालय पणजी यांच्या सयुंक्त विद्यामाने आज पणजी येथील फार्मासी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जागतीक फार्मासी दिन सोहळ्यात आरोग्यमंत्री राणे बोलत होते.

एफडीये चे काम चांगले असून संचालक ज्योती सरदेसाई (Jyoti Sardesai)या राज्यातील सर्व घटकांशी ते नेहमीच संपर्क ठेऊन काम करत आहेत. कोविड नियंत्रणात फार्मासिस्ट व फार्मासुटीकल कंपण्याची महत्वाची भुमीका आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याने उत्कृष्ट कामगारी केल्यामुळेच कोरोनावर नियंत्रण आल्याचे राणे म्हणाले. FDA व फार्मासुटीकल कंपण्यायांनी फार्मसिस्टसाठी वेळोवेळी प्रशिक्षण ठेवल्यास त्यांना नव्या औषधाबाबत योग्य ती माहिती होईल. असे सांगून कोविड वॉरीयर्सच्या कामाला फार्मासुटीकल व फार्मासिस्ट याचे योग्य सहकार्य मिळत असल्याचे राणे यांनी सांगितले.

फार्मासिस्टच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. नव नव्या संधीद्वारे रुग्णांवर योग्य उपचार घडत आहेत. एफडीए आपले काम चोख करत आहे. असे ज्योती सरदेसाई यांनी यावेळी संगितले. औषधांच्या किंमती आटोक्यात राहाव्यात यासाठी APPA दिल्ली एफडीएच्या सतत संपर्कात राहात असून सेवाभावनेतून हे कार्य चालल्याचे प्रतिपादन व्हर्चुअल माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या एनपीपीएच्या सदस्य सचिव डॉ. विनोद कोतवाल यांनी केले. तर राज्यातील ५०० फार्मासिस्टना प्रशिक्षण देऊन वैज्ञानिक करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे डॉ. कुल्लर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात कोविड काळात चांगले कार्य केल्याबद्दल FDA च्या संचालक ज्योती सरदेसाई, उपसंचालक मेघा सिनाई देसाई, तसेच हेलन डिसा, निलीमा मिशाळ, डॉ. राजेश परब, डॉ. राजश्री गुडे, यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लविना डीकोस्टा, आर्या चिमुलकर, प्रचिता गावस देसाई, आल्वीया रॉड्रिग्ज, रुतीका नाईक आदी फार्मासी विद्यार्थ्यांना प्रकमाणपत्रे देभन गौरवण्यात आले.

यावेळी अन्न व औषधे प्रशासनालयाच्या (FDA) संचालक ज्योती सरदेसाई , तांत्रिक शिक्षण संचालनायलाचे संचालक विवेक कामत, फार्मासुटीकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रविण कुल्लर, आयपीए गोवा चे अध्यक्ष डॉ. गोपाळ कृष्ण राव व सचिव प्रसाद तांबा व्यासपिठावर उपस्थित होते.स्वागत डॉ. राव यांनी केले तर आभार प्रसाद तांबा यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT