National Games 2020 Goa Opening Ceremony Viral Video Dainik Gomantak
गोवा

National Games Goa उद्घाटन कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या... व्हिडिओ व्हायरल Watch

फातोर्डा मैदानावर रंगलेल्या उद्घाटन समारंभात गायक सुखविंदर सिंह, हेमा सरदेसाई यांनी सादरीकरण केले.

Pramod Yadav

National Games 2020 Goa Opening Ceremony Viral Video: गोव्यात होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवारी फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु मैदानावर रंगला. या समारंभाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास उपस्थिती होती. मोदीच्या हस्ते ज्योत प्रज्वलित केल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला अधिकृत सुरुवात झाल्याची मोदींनी घोषणा केली.

या उद्घाटन समारंभात अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

फातोर्डा मैदानावर रंगलेल्या उद्घाटन समारंभात गायक सुखविंदर सिंह, हेमा सरदेसाई यांनी सादरीकरण केले. याशिवाय विविध कलाविष्कारांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

रंगारंग कार्यक्रमाला राज्यासह देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून लोकांनी हजेरी लावली होती, पण या कार्यक्रमात अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर समोर आला आहे.

उद्घाटन समारंभाला सुरुवात होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी मैदानावर हजेरी लावल्यानंतर ज्योत प्रज्वलन आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे भाषण पार पडले.

त्यानंतर गायक सुखविंदर सिंह आणि हेमा सरदेसाई यांचे तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण झाले. उद्घटन कार्यक्रमाच्या निमित्ताने मैदानावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT