Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: उत्तर प्रदेशच्या कंपनीचा गोव्यातील 1000 गुंतवणुकदारांना गंडा; सुमारे 10 कोटी लुबाडले

जास्त व्याजदराचे आमिष; गुन्हा दाखल, तीन वर्षांपासून परतावाच नाही

Akshay Nirmale

Goa Fraud Case: उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका कंपनीने गोव्यातील तब्बल 1000 लोकांची फसवणूक केली आहे. या 1000 गुंतवणूकदारांकडून जादा व्याजाच्या आमिषाने पैसे गोळा केले गेले, पण गेल्या 3 वर्षांत या गुंतवणूकदारांना परतावाच देण्यात आलेला नाही.

या फसवणुकीतील रक्कम जवळपास 10 कोटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील संबंधित कंपनीविरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कंपनीने सुमारे 1000 गुंतवणूकदारांची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुंतवणुकदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचा अध्यक्ष आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कर्मभूमी इन्फ्राटेक रियल्टी लिमिटेड असे कंपनीचे नाव आहे. कंपनीचे मुख्यालय मथुरा येथे आहे. कंपनीने 2013 मध्ये फोंडा, गोवा आणि 2018 मध्ये म्हापसा शहरात ऑफिस सुरू केले होते. कंपनीने विविध योजनांद्वारे गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनांकडे आकर्षित झाले. जास्त व्याजाची लालूच दाखवून कंपनीने सुमारे 1000 गुंतवणूकदारांकडून 10 कोटी रुपये जमा केले.

सुरूवातीच्या काळात काही लोकांना पैसे करत केले गेले, मात्र गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने एकाही गुंतवणूकदाराला पैसे परत केलेले नाहीत. त्यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत कंपनीचा अध्यक्ष देवेंद्र पाल सिंह, व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सेंगर आणि विभागीय व्यवस्थापक नीलेश सुर्वे यांच्याविरोधात तक्रार केली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या दोघांनी 10 राज्यांतील लोकांकडून चार वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT