Utta Movement death case hearing completed after 11 years Dainik Gomantak
गोवा

उटा आंदोलन मृत्यू प्रकरणाची सुनावणी तब्बल 11 वर्षानंतर पूर्ण

30 मार्च रोजी निकाल; मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप झाले होते हुतात्मे

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षणासह त्यांच्या हक्काचे अधिकार मिळावेत यासाठी 11 वर्षांपूर्वी बाळ्ळी येथे झालेल्या उग्र आंदोलनाच्या वेळी मंगेश गावकर व दिलीप वेळीप या दोन आंदोलकांना यावेळी झालेल्या जाळपोळीत मृत्यू आला होता. या प्रकरणाची सुनावणी मागची 11 वर्षे येथील सत्र न्यायालयात (court) चालू होती ती आज पूर्ण झाली.

दक्षिण गोव्याचे (South Goa) प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर आज पूर्ण झाली. या प्रकरणी 14 संशयितावर भादंसंच्या 304 (सदोष मनुष्यवध) कलमाखाली आरोप दाखल झाले होते. आता या प्रकरणी आता 30 मार्च रोजी न्या. आगा निवाडा देणार आहेत. या सुनावणीत संशयितांच्या वतीने अमेय प्रभुदेसाई यांनी तर सीबीआयच्यावतीने वकील नौशाद यांनी बाजू मांडली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, 25 मे 2011 रोजी हे आंदोलन झाले होते. दिवसभरात झालेल्या या आंदोलनाला (Movement) संध्याकाळी हिंसक वळण लागले. त्याला स्थानिकांनी त्याच भाषेत उत्तर देत एक काजूचा कारखाना पेटवून दिला. या कारखान्यात मंगेश व दिलीप हे दोन आंदोलक या कारखान्यात अडकले होते. त्यात त्यांचा गुदमरून अंत झाला.

या प्रकरणी सुरवातीला सीबीआयने (CBI) 15 संशयितांवर खुनाचे आरोपपत्र दाखल केले होते. मात्र नंतर हा प्रकार नियोजितपणे केल्याचे पुरावे पुढे न आल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली आरोप दाखल करून घेतले होते. ही सुनावणी चालू असताना एका संशयिताला मृत्यू (Death) आला होता.

आज झालेल्या अंतिम युक्तिवादात प्रभुदेसाई यांनी या मृत्यू प्रकरणी सुरवातीला अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल झाली होती आणि आरोप दाखल झालेल्या एकाही संशयिताचे नाव घेतले नव्हते. उलट जे संशयित आहेत त्यांनी त्या कारखान्यात अडकलेल्याना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. हे साक्षीदारांच्या साक्षीतून पुढे आले आहे. असा युक्तिवाद करताना आपल्या आशिलांचा या हत्येत कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही असा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT