Utpal Parrikar letter for voters Dainik Gomantak
गोवा

माझ्या प्रिय पणजीकरांनो, उत्पल पर्रीकरांचं खुलं पत्र

निवडणुकीवेळी दिलेल्या पाठिंब्यासाठी मतदारांचे आभार, विरोधकांनाही उत्पल यांचे धन्यवाद

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीनंतर पणजीतील अपक्ष उमेदवार आणि मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदारांसाठी खुलं पत्र लिहिलं आहे. आपल्याला मतदान केलेल्या मतदारांचे त्यांनी जाहीर आभार मानले आहेत. यासोबतच विरोधकांनाही त्यांनी धन्यवाद दिलेत. उत्पल पर्रीकरांनी आपलं पत्र ट्विट केलं आहे. (Utpal Parrikar News Updates)

गेला महिना किंवा त्याहूनही जास्त मी पणजी परिसरात भरपूर फिरलोय. मतदारसंघात फिरताना मला तुमच्यापैकी अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली, आणि आता मला कळून चुकलंय की माझे वडिल दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना पणजी आणि पणजीकरांचं प्रेम कसं मिळालं असेल. आज मला गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पणजी परिसरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, ज्यासाठी मी पणजीतील नागरिकांचा आभारी आहे, असं उत्पल (Utpal Parrikar) यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

मी पणजीतील प्रत्येक मतदाराचा आभारी आहे, ज्यांनी मला मतदान केलं, मला आशीर्वाद दिले, आणि पाठिंबाही दिला. मला माझ्या तमाम समर्थकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी मी निवडून यावं यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. प्रचारावेळी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वत:च्या वस्तू, गाड्या वापरुन माझा प्रचार केला. माझ्यासाठी वेळ दिला. मी पणजी (Panjim) शहराला अद्ययावत आणि स्मार्ट सिटी करण्याच्या माझ्या वचनाचा पुनरुच्चार करतोय, ज्यामुळे पणजीचं गतवैभव पुन्हा मिळवून देता येईल, असं उत्पल यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे.

उत्पल पर्रीकरांनी आपल्या विरोधकांचे आणि टीकाकारांचेही आभार मानलेत. ते म्हणाले, मी माझ्या सर्व विरोधकांचे आभार मानतो, ज्यांनी मला जास्त प्रयत्न करण्यास भाग पाडलं आणि माझ्यातलं सर्वोत्तम लोकांपुढे मांडण्याची संधी दिली. माझ्या वडिलांनी दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी आणि पर्रीकरांच्या स्वप्नातील पणजी प्रत्यक्षात आणण्यासाठी मला याची मदत होईल असंही उत्पल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Mala Lake Update: मळ्यातील ‘सील’ केलेल्या घरांचा अहवाल सादर करा, न्यायालयाचा महानगरपालिकेला आदेश

Mickky Pacheco Arrest Warrant: हायवे अडवणे माजी मंत्र्याला भोवले! मिकी पाशेको यांच्या अटकेचे आदेश; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड-भाजप युतीच्या बातम्या फक्त अफवा', मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना आमदार सरदेसाईंनी सुनावले

Goa Wildlife Conservation: वनमंत्री विश्वजीत राणे अ‍ॅक्शन मोडमध्ये! बिबट्याचा मृत्यू ते बोंडला प्राणीसंग्रहालयाचा कायापालट; जाहीर केला नवा अजेंडा

Goa Kala Academy: कला अकादमी पुन्‍हा 1 ऑगस्टपासून बंद, IIT मद्रासचा धक्कादायक रिपोर्ट; नूतनीकरण कामाचे निघाले वाभाडे

SCROLL FOR NEXT