Goa Election: Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकर पणजीतून निवडणूक लढवणारच

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांच्या घोषणेमुळे भाजपामध्ये खळबळ

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी संरक्षण मंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पूत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी मतदारसंघातून (Panajim) आपण निवडणूक (Goa Assembly Election)लढवणारच, अशी घोषणा केल्यामुळे भाजपात (BJP) खळबळ उडाली आहे. कारण सध्या आमदार बाबूश मोन्सेरात हे भाजपात आहेत. त्यामुळे ते संभाव्य उमेदवार ठरतात.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मोन्सेरात यांनी 30 पैकी 26 जागांवर आपल्या समर्थकांना निवडून आणून आपला उमेदवारीचा दावा मजबूत केला आहे. त्यांचे एक ज्येष्ठ सहकारी उदय मडकईकर हे त्यांची साथ सोडून कॉंग्रेसमध्ये गेले आहेत. मात्र, मडकईकर यांचा प्रभाग ताळगाव मतदारसंघात येत असल्याने मोन्सेरात यांच्या मतांवर मोठासा परिणाम झालेला नाही. पणजी भाजप मंडळ मोन्सेरात यांच्यासोबत आहे. तसेच सर्व 25 नगरसेवकही सध्यातरी त्यांच्यासोबत आहेत.

पक्षाच्या विविध विभागांवरही मोन्सेरात यांच्या समर्थकांचीच वर्णी लागली आहे. तर उत्पल पर्रीकर यांच्यासोबत भाजपचे जुने कार्यकर्ते असून, ते स्व. मनोहर पर्रीकर यांना आजही मानतात. पणजी भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी न देता सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना दिल्याच्या रागातून मतदानात भाग घेतला नाही आणि त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर बाबूश निवडून आले. त्यानंतर ते 10 आमदारांसोबत भाजपात दाखल झाले. आता पुन्हा विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून, उत्पल पर्रीकर यांनी उमेदवारीची दावेदारी केल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतेही संभ्रमात पडले आहेत.

फडणवीस यांच्याकडे केलीय इच्छा व्यक्त...

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गोव्यात आले होते, तेव्हा आपण पणजीतून आपणास उमेदवारी हवी अशी इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले. आपण गेली अनेक वर्षे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या सतत संपर्कात आहे. भाजपचे मूळ कार्यकर्ते व मतदारांनाच आपण पणजीतून निवडणूक लढवावी, असे वाटते. त्यानुसार आपण आपली इच्छा व्यक्त केली असून, पक्षाने पुढील प्रक्रिया सुरू केलेली आहे. सध्यातरी अपक्ष लढण्याची इच्छा नाही. भाजपची उमेदवारी मिळेल अशी आशा आहे, असेही उत्पल यांनी सांगितले.

"मी भाजपचा गोवा प्रदेश अध्यक्ष आहे. आपले काम राज्यात संघटना वाढवणे व मजबूत करणे हे आहे. उमेदवारी देण्याचे अधिकार हे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे असतात. भाजपमध्ये त्यासाठी एक प्रक्रिया आहे, त्यानुसार उमेदवारी दिली जाते. उमेदवारीची इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही. मात्र, पक्षाच्या शिस्तीत राहून सर्व प्रकिया व्हाव्यात. उत्पल पर्रीकर यांना पक्षात भवितव्य आहे."

- सदानंद शेट तानावडे, भाजप, प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT