BJP Press Conference in Goa on Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

'उत्पलनी मनोहर पर्रीकरांचं स्वप्न पूर्ण करावं'

उत्पल यांनी भाजप सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा भाजप प्रभारी सी टी रवी यांचा सल्ला

दैनिक गोमन्तक

पणजी : मनोहर पर्रीकर यांनी नेहमीच भाजपच्या विजयासाठी काम केलं आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही आपल्या भाजप सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा सल्ला भाजप प्रभारी सी टी रवी यांनी दिला आहे. पणजीतून आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा उत्पल यांनी पुनर्विचार करावा आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं असं आवाहनही रवी यांनी केलं आहे. (BJP on Utpal Parrikar News Updates)

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या 30 जानेवारीला गोव्यात येणार असल्याचंही सी टी रवी यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी अमित शाह उत्पल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उत्पल पर्रीकरांच्या बंडाचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असं जरी भाजप नेते बोलत असले तरीही त्यांचा अपक्ष लढण्याचा निर्णय भाजपने गंभीरतेने घेतल्याचं दिसत आहे. त्यात उत्पल पर्रीकरांनी पक्षाने पणजीतून प्रामाणिक उमेदवार दिल्यास माघार घेण्याची भूमिका घेतल्याने बाबूश मोन्सेरात यांची पाठराखण करण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न चालवल्याचं चित्र आहे.

पणजीतून भाजपच्या (BJP) तिकीटासाठी इच्छुक असलेल्या उत्पल पर्रीकरांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि उत्पल यांनी पक्षाला रामराम ठोकत अपक्ष लढण्याची घोषणा केली. भाजपने उत्पल यांना विधानसभा निवडणुकीसाठी डिचोली आणि कळंगुट या जागांची ऑफर दिली होती. डिचोलीतील जागेवर लढणारे सभापती राजेश पाटणेकर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव निवडणूक लढवू इच्छित नव्हते. मात्र उत्पल यांच्या नकारानंतर भाजप नेत्यांनी पाटणेकर यांची समजूत काढली आणि त्यांना डिचोलीतून उमेदवारीही जाहीर केली.

दरम्यान उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजपने कळंगुटमधून निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. मात्र उत्पल यांनी त्यालाही नकार देत अपक्ष लढण्याचा पवित्रा घेतला. कळंगुटमध्ये मायलक लोबोंनी बंड करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आहे. या मतदारसंघात लोबोंचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे उत्पल यांनी कळंगुटमधून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचंही बोललं जात आहे. उत्पल पर्रीकर हे फार आधीपासून पणजीतून लढण्यास आग्रही होते. त्यामुळे आपल्या निर्णयावर ठाम राहात उत्पल यांनी भाजपचा राजीनामा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT