Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पणजीत मतपेढीचा डाव? उत्पल पर्रीकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'घाबरुन ते आता...'

Utpal Parrikar Press Conference: पणजी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्ताधाऱ्यांकडून मतपेढीची तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रीकर यांनी केला.

Manish Jadhav

पणजी: पणजी विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्ताधाऱ्यांकडून मतपेढीची तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रीकर यांनी केला. 2019 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराविरोधात केवळ साडेसहाशे मतांच्या फरकाने विजयी झालेले सध्याचे मंत्री आगामी निवडणुकीसाठी मोती डोंगरसारखी विश्वासू मतपेढी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा हल्लाबोल पर्रीकर यांनी शुक्रवारी (23 मे) पत्रकार परिषद घेऊन केला.

या संदर्भात बोलताना त्यांनी दावा केला की, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याच्या हेतूने एकाच वेळी तब्बल 28 मतदान केंद्र अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. ही बाब केवळ सामान्य प्रशासनिक बदल नसून सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक (Election) यंत्रणेत हस्तक्षेपाचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे हे खाते आहे, तेच सध्या पणजीचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री आहेत. त्यामुळे या कृतीकडे अत्यंत संशयाच्या नजरेने पाहिले पाहिजे, असे पर्रीकर म्हणाले.

निवडणूक यादीतील नाव समावेशावर प्रश्नचिन्ह

निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत उत्पल पर्रीकर यांनी सांगितले की, निवडणूक यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी केवळ आधार कार्डाची छायांकित प्रत पुरेशी ठरत नाही. कारण आधारकार्ड हे नागरिकत्व सिद्ध करणारे दस्तऐवज नाही. त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बाहेरील लोकांची नावे यादीत घालण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर, त्यांनी सांगितले की, हा प्रकार रोखण्यासाठी तालुक्याच्या मामलेदारांकडे तक्रार नोंदवली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास राज्य निवडणूक आयुक्तांकडेही निवेदन दिले जाईल. एवढेच नव्हे तर न्यायालयीन लढ्यालाही ते तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय वातावरण तापणार?

उत्पल पर्रीकर यांच्या आरोपांमुळे पणजीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. भाजपमधून (BJP) अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र असलेल्या उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT