UTA president vishwas gaude  Dainik Gomantak
गोवा

"प्रमोद सावंतांना मुख्यमंत्री करण्यात मंत्री गावडेंचा सिंहाचा वाटा", 'उटा'च्या अध्यक्षांचा दावा

Minister Govind Gaude Role in CM Appointment: शुक्रवारी फार्मागुडी येथील गोपाळ गणपती देवस्थान सभागृहात उटा संघटनेने आयोजित केलेल्या सभेला गोमंतकीय जनतेने उत्स्फूर्त सहभाव नोंदवला. काही माध्यमांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या भाषणाचा अर्थ चुकीचा लावल्याचे उटाचे अध्यक्ष विश्वास गावडे म्हणाले.

Manish Jadhav

आदिवासी कल्याण खात्याची गरजच काय? राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ते सरकारी कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचे भाष्य करणे कला संस्कृती आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे (Govind Gaude) यांना चांगलच भोवलं आहे. गावडे यांच्या वक्तव्याची भाजपने गंभीर दखल घेतली. गावडे यांना मंत्रिपदाला मुकावे लागू शकते, असा कयास लावला जात आहे. याचदरम्यान, शुक्रवारी (30 मे) फार्मागुडी येथील गोपाळ गणपती देवस्थान सभागृहात मंत्री गावडे यांच्या समर्थनार्थ उटा संघटनेने सभेचे आयोजन केले.

गोपाळ गणपती देवस्थान सभागृहात सभेचे आयोजन

दरम्यान, शुक्रवारी फार्मागुडी येथील गोपाळ गणपती देवस्थान सभागृहात उटा संघटनेने आयोजित केलेल्या सभेला गोमंतकीय जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काही माध्यमांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या भाषणाचा अर्थ चुकीचा लावल्याचे उटाचे अध्यक्ष विश्वास गावडे यावेळी म्हणाले. तसेच, गावडे यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचे देखील उटाचे अध्यक्ष म्हणाले.

प्रमोद सावंतांना मुख्यमंत्री करण्यात गावडेंचा मोठा वाटा

उटाचे अध्यक्ष गावडे म्हणाले की, ''मंत्री गावडे यांनी वेळोवेळी सावंत सरकारला मदत केली. यामध्ये मग शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणूत असो वा 2022ची निवडणूक असो. एवढचं नाहीतर डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात देखील गोविंद गावडेंनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र आता राजकीय फायद्यासाठी काही लोक गावडेंना या प्रकरणात गोवत आहेत. गावडेंच्या विरोधात सरकारामधूनच षडयंत्र सुरु आहे. एक कोणतरी राजकीय व्यक्ती गावडेंचे अस्तित्व संपवू पाहत आहे. मात्र आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की, मंत्री गोविंद गावडेंच्या पाठीशी उटा संघटना उभी आहे.''

'माझी ॲलर्जी असणाऱ्या माध्यमांनी अर्थाचा अनर्थ केला'

दरम्यान, गावडे यांनी बुधवारी (28 मे) मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली. त्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना मुख्यमंत्री हे आपले जवळचे मित्र असल्‍याचे सांगत आदिवासी भवन आणि आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर आपण बोलल्याचे नमूद केले. मात्र, त्याचा चुकीचा संदर्भ घेत आपली ॲलर्जी असलेल्या माध्यमांनी, पत्रकारांनी अर्थाचा अनर्थ केला, असा आरोप मंत्री गावडे यांनी केला.

25 मे रोजी फोंडा येथे राजीव गांधी कला मंदिरातील सरकारी कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. तिथे मी काय म्हणालो, यातील प्रत्येक क्षण सर्वांसमोर आहे. माध्यमांनी अर्थाचा अनर्थ केल्याने मुद्दाम प्रवास करुन मी आज गोव्यात (Goa) आलो आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर केलेल्या वक्तव्यावर मी बोलू शकत नाही. मुख्यमंत्री कोणत्या संदर्भाने बोलले, हे मला ठाऊक नाही, असेही गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT