ST community meeting at Utorda in Goa demanding political reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: "'एसटीं'च्या सहनशीलतेचा अंत नको!" राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी उतोर्डा येथील बैठकीत 'उटा' आक्रमक

UTA Political Reservation: प्रकाश वेळीप यांनी आता सरकारने आमच्या सहनशीलतेची आणखी परीक्षा पाहू नये, असे खडसावून सांगितले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: राजकीय आरक्षणाबाबत आता ‘उटा’ संघटना आक्रमक झाली असून, आदिवासी समाजाचा अंत बघू नये, असा निर्वाणीचा इशारा आज उतोर्डा येथे झालेल्या ‘उटा’च्या बैठकीत देण्यात आला.

त्यावेळी ‘उटा’ संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रकाश वेळीप यांची निवड करण्यात आली. या बैठकीस सभापती गणेश गावकर, आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, आमदार आंतोन वाझ, गोविंद शिरोडकर तसेच समाजातील अन्य नेते उपस्थित होते.

यावेळी सभापती गणेश गावकर म्हणाले, मी ‘सभापती’ या नात्याने नव्हे, तर या समाजाचा एक घटक व आमदार म्हणून या बैठकीला उपस्थित राहिलो आहे, असे सांगतानाच आजचा हा ऐतिहासिक दिवस असून, आम्ही सातत्याने राजकीय आरक्षणाचा पाठपुरावा केला आहे. मात्र, याबाबत अजूनही अधिसूचना काढलेली नाही. आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, कोण राजकारण करतो हे माहीत नाही. आम्हाला घटनेने दिलेला हक्क मिळालाच पाहिजे.

आमदार गोविंद गावडे यांनी आज ‘उटा’ संघटना मजबूत झाल्याचे सांगितले. गोविंद शिरोडकर यांनी आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे सांगतानाच आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो नाहीत, असे सांगितले. अन्य समितीच्या इतर सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

अंतर्गत मतभेद दूर : रमेश तवडकर

‘उटा’ संघटनेमधील अंतर्गत वादही आता मिटला असून, या संघटनेच्या नेतृत्वाखाली आता समाजाच्या हक्कासाठी पुढील लढा दिला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मंत्री रमेश तवडकर म्हणाले, की आमच्यातील मतभेद आता दूर झाले आहेत. संघटना मजबूत करण्यावर आमचा आता भर असेल. राजकीय आरक्षण एका महिन्यात मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न असतील.

रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका

प्रकाश वेळीप यांनी आता सरकारने आमच्या सहनशीलतेची आणखी परीक्षा पाहू नये, असे खडसावून सांगितले. २०२७ च्या निवडणुकीत घटनेने दिलेल्या हक्कानुसार आम्हाला १२ टक्के राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, ते द्यावे. एसटी समाजबांधवांनी रस्त्यावर येण्याची वाट पाहू नये, असेही त्यांनी सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT