Usgao Crime News Dainik Gomantak
गोवा

Usgao Crime News: 'व्हॅलेंटाईन डे' दिवशीच प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला! उसगावातील तरुणाला घेतले ताब्यात...

गावकारवाडा-उसगाव येथे आज बुधवार (ता. 14) हा प्रकार घडला असून यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Kavya Powar

Usgao Crime News

व्हॅलेंटाईन डे निमित्त एकीकडे प्रेमाचा वर्षाव होत असताना एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावकारवाडा-उसगाव येथे आज बुधवार (ता. 14) हा प्रकार घडला असून यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उसगाव येथील 22 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडली. त्यावेळी आधीपासूनच तिच्या मागावर असलेल्या तरुणाने 'व्हॅलेंनटाईन डे' निमित्त तिला प्रेमाची मागणी घातली.

तरुणीने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आपल्याला नकार दिल्याच्या आणि तरुणीवरील एकतर्फी प्रेमाच्या रागातून त्या तरुणाने तिच्यावर दारूच्या बॉटलने प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये तरुणीच्या डोक्याला मार लागला असून ती गंभीररित्या जखमी झाली आहे. हल्ला केल्यानंतर संशयित तरुण घटनास्थळावरून पसार झाला. यामधील महत्वाची बाब म्हणजे 2 महिन्यांपूर्वी देखील असाच प्रकार घडला असून आज दुसऱ्यांदा तिच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच जखमी तरुणीला उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलीस या घटनेतील आरोपी मंथन गावडे (24, उसगाव, पाली) याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT