Sanquelim Municipal Elections 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Election 2023 उमेदवार निवडून येण्यासाठीच विरोधी गटाकडून दडपण -दंडेलशाहीचा वापर

प्रवीण ब्लेगन: ‘टुगेदर फॉर साखळी’ सर्वपक्षीय पॅनल

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Municipal Election ‘टुगेदर फॉर साखळी’चे उमेदवार निवडून आणण्यासाठी आता आपण कार्यरत आहोत, बिनविरोध निवडून आल्याने ही गोष्ट साध्य झाल्याचे सांगत प्रवीण ब्लेगन म्हणतात, विरोधी उमेदवाराने माघार घेण्यासाठी आम्ही कोणावरही दडपण आणले नाही.

दडपण आणि दंडेलशाहीचे काम विरोधी गटाचे आहे. आपण जे मागील 30-35 वर्षांत राजकीय कार्य केले. त्यामुळे केवळ एकाच पक्षात मित्र नाहीत, तर कदाचित त्यांना प्रवीण यांना हरवू शकत नाही, असे वाटल्यानेच आपल्याला बिनविरोध केले असावे, असे दिसते.

मित्रांच्या यादीत प्रमोद सावंत बसत नाहीत, त्यांच्यामुळेच आपण भाजप सोडला. सावंत यांना 2008 मध्ये ऐनवेळी उमेदवारी दिली, तेव्हाच आपण भाजपमधून बाहेर पडलो. परंतु भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी आपली घट्ट मैत्री आहे.

निवडणूक आली, की आपणास भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असते? यावर ब्लेगन म्हणतात, निवडणूक आली की अशी चर्चा सतत असते. त्यांच्याकडून चंद्रही देण्याची तयारी असते, पण आपण लोकांचा विश्‍वासघात करू इच्छित नाही.

`टुगेदर फॉर साखळी‘ हा सर्व पक्षीय पॅनल आहे. आपण पुढील पाच वर्षांसाठी या पॅनलसाठी काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

‘टुगेदर फॉर साखळी’कडे उमेदवार नसल्याचे सांगितले जात होते, त्यामुळे मुलीला उमेदवारी द्यावी लागली? यात तथ्य सांगायचे झाल्यास, मुलगी सज्ञान आहे आणि ती कुठेही उमेदवारी दाखल करू शकते.

भाजपकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे त्यांनी आमचे सहाजण पळविले. भाजपने आत्तापर्यंत झेंडे लावणारे कार्यकर्ते निर्माण केले. भाजपचे अनेक कार्यकर्ते सक्षम आहेत, पण त्यांना पुढे येऊन दिले जात नाही. साखळीच्या विकासावर ते सांगतात, साखळी हे निवासाचे ठिकाण उत्तम आहे.

विजेचा प्रश्‍न नाही, पाण्यासाठी येथून वाळवंटी नदी वाहते. प्रतापसिंह राणे यांनी साखळीचा विकास केला आहे. जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह झाले, उच्चमाध्यमिक, महाविद्यालय झाले. त्याशिवाय मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पही निर्माण झाला.

पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत त्याचबरोबर पाणी उपसा करण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारले गेले. गोशाळा हवी आहे, आंतरराष्ट्रीय स्टेडियम होणे आवश्‍यक आहे. कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आहे, हेल्थ सेंटर झाले आहे, तेथील ऑपरेशन थिएटर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे.

चर्चा फॅमिलीराजची!

प्रवीण आणि त्याची मुलगी, धर्मेश सगलानी आणि त्याची पत्नी निवडणुकीत राहिली की भाजपने ‘फॅमिली राज'' म्हणून बोलण्यास सुरुवात केली. परंतु फॅमिली राज भाजपनेच आणला. विधानसभेत किती फॅमिली राज आहे.

माझी मुलगी शिकलेली आहे, ‘टुगेदर फॉर साखळी‘ने अंगुठा छाप उमेदवार दिलेले नाहीत, असा टोला विरोधकांना लगावत ब्लेगन म्हणतात रवींद्र भवन हा मुख्यमंत्र्यांचा राजकारणाचा अड्डा बनला आहे.

आमच्या उमेदवाराबरोबर कोणी फिरल्यास त्यांना रात्रीचे फोन करतात, धमकी देतात. सीआयडीची भीती घालतात. त्यामुळे बॅलेट पेपरवर होणारी या निवडणुकीमुळे ‘भिवपाची गरज ना’, असे आपण सांगत असून, लोकांनी न भीता मतदान करावे आणि टुगेदर फॉर साखळीवर विश्‍वास ठेवावा, असेही ब्लेगन म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT