Untimely rains in Goa increase in infectious diseases  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात अवकाळी पावसामुळे संसर्गजन्‍य आजारांत वाढ

राज्यात आधीच कोविडने लोकांची घाबरगुंडी उडविली आहे. त्यात पावसामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखवण्याचे प्रकार वाढले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात अवकाळी पावसामुळे संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाच्या साठणाऱ्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यानेही आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. विविध आजारांना हे वातावरण निमंत्रण देत आहे. त्यामुळे पणजीसह विविध शहरे आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. गोमेकॉमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून, दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. विशेषतः सर्दी, खोकला आणि ताप या लोकांच्या आरोग्य विषयक समस्या आहेत.

पावसाची हजेरी कायम राहिल्यास राज्यात संसर्गजन्‍य आजार वाढण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परिसरात साचून राहणाऱ्या‍ पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आजार बळावतात. ते सुरुवातीला सामान्य वाटत असले तरी, त्यातून न्यूमोनिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा आजारांचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून जागृती केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भीती कोविडची!

राज्यात आधीच कोविडने लोकांची घाबरगुंडी उडविली आहे. त्यात पावसामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखवण्याचे प्रकार वाढले आहे. ही सर्व कोविडचीही लक्षणे असल्यामुळे लोकांमध्ये भीती आहे. पण, प्रत्यक्षात पावसामुळे हे संसर्गजन्‍य आजार वाढल्याचे खासगी डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य खात्याकडून मात्र याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.

सध्‍याच्‍या वातावरणात सर्दी, खोकला ही आजाराची सामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

-डॉ. नागेश भाटकुली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: केळशी हादरली! विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह; गळ्यात आढळली दोरी, संशयाची सुई खुनाच्या दिशेने?

Meta Smart Glasses: "सावधान! तुमचे खाजगी क्षण कोणीतरी पाहतंय!" मेटा चष्म्यांनी टिपलेले व्हिडिओ होतायत लीक; केनियातील डेटा वर्कर्सचा धक्कादायक खुलासा

Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT