Sanguem Goa Unseasonab Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: अवकाळी पावसाचा सांगे परिसराला जोरदार तडाखा, व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ; पुरुमेंत फेस्ताच्या बाजारात शिरले पावसाचे पाणी

Sanguem Goa Unseasonab Rain: अवकाळी पावसाने रविवारी सांगे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. याचवेळी सुरू असलेल्या सांगेच्या वार्षिक पुरुमेंत फेस्ताच्या फेरीत पावसाचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सांगे: अवकाळी पावसाने रविवारी सांगे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. याचवेळी सुरू असलेल्या सांगेच्या वार्षिक पुरुमेंत फेस्ताच्या फेरीत पावसाचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. मालाची नासाडी टाळण्यासाठी व्यापारी ताडपत्री व प्लास्टिकचे आवरण घालण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.

दरम्यान, पावसासोबत वादळी वाऱ्यानेही जोर धरल्याने तात्पुरती उभारण्यात आलेली अनेक दुकाने डळमळू लागली. विजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती आणखी विकट झाली. वरून कोसळणारे पावसाचे पाणी आणि खाली साचलेले पाणी यामुळे कपडे, सुकी मासळी, मसाले तसेच अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः रेडिमेड गारमेंटच्या गेले. दुकानांतील व्यापाऱ्यांना माल सावरणे कठीण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा

मिळाला असला तरी फेस्ताच्या फेरीवर पाणी साचल्याने व्यापारी आणि नागरिकांचा हिरमोड झाला. गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे फेरीत आलेल्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्राहकांची गर्दी होण्याच्या वेळेतच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले दरम्यान, वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या फोडावासीयांना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक कोसळलेल्या पर्जन्यसरींनी दिलासा दिला.

पाऊणतास पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात गारवा राहिला. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याच्या तीव्र झळांनी राज्यातील जनता हैराण झाली. रविवारी संध्याकाळी मात्र वातावरणात अचानक बदल होत आकाश ढगांनी दाटून आले. हवामान खात्याने तुरळक पावसाची शक्यता वर्तविल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सूर्यास्तावेळी आकाशात पसरलेल्या तांबड्या रंगछटांनी सान्यांचे लक्ष वेधून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT