Rain At National Games Goa 2023 Sandeep Desai
गोवा

National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रंगला खेळ पावसाचा, गोव्यात वेधशाळेद्वारे यलो अलर्ट

Rain At National Games Goa 2023: अवघ्या काही तासांत पुन्हा नियोजन करून स्पर्धा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Rain At National Games Goa: गोव्यात बुधवारी पहाटे 05 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी काही प्रमाणात वाहतुकीवरदेखील परिणाम दिसून आला. आकस्मित मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला. क्रीडा ग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

क्रीडा स्पर्धेसाठी आणण्यात आलेले जनरेटर तसेच इतर साहित्य भिजून गेले; परंतु अवघ्या काही तासांत पुन्हा नियोजन करून स्पर्धा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्या. गोवा वेधशाळेद्वारे आज, उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

शिवोलीत कोसळले झाड

बुधवारी पहाटे अचानक झालेल्या जोरदार वारा तसेच पावसामुळे शिवोली- सडयेत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर सडयें होली क्रॉस हायस्कूलला लागून असलेल्या रस्त्याशेजारचे भलेमोठे आंब्याचे झाड मुळासकट कोसळून पडल्याने या भागातील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

घोलान मार्ना येथील शाम धारगळकर यांच्या राहात्या घरावर झाडाची फांदी तुटून पडल्याने घरावरील पत्र्यांची नासधूस झाली.

Rain At National Games Goa 2023
Rain At National Games Goa 2023

पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येही पाणी

म्हापसा येथील पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. खेळाडू तसेच इतर प्रतिनिधींसाठी जेवण बनविण्यासाठी उभारलेल्या स्वयंपाक तंबूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले. त्यामुळे व्यवस्थापन तसेच कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

परिणामी, कर्मचाऱ्यांना या तंबूमधील साहित्य दुसऱ्या तंबूत हलविण्याची वेळ आली. कालांतराने व्यवस्थापनाने या स्थितीवर नियंत्रण मिळवले.

"पावसामुळे काही स्पर्धाच्या वेळेत बदल करावा लागला. आज रात्रीपर्यंत बहुतांशी स्पर्धा संपुष्टात येतील. केवळ सायकलिंग स्पर्धा बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये पाऊस पडला तरी व्यत्यय येणार नाही; कारण ती आऊटडोअर स्पर्धा आहे. अग्रिशमन, साबांखा, वीज खाते यांनी उत्तमरीत्या कामगिरी बजावल्याने स्थिती आटोक्यात आणण्यास मदत झाली," असे राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT