unseasonal rain in 5th iffi goa Lights and screens turned Dainik Gomantak
गोवा

Rain at IFFI Venue: अवकाळी पावसाची 'इफ्फी'त एंट्री! लाइट्स अन् स्क्रीन्स झाल्या बंद....

परतलेल्या मॉन्सूनने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे.

Kavya Powar

Rain at IFFI Venue: परतलेल्या मॉन्सूनने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. काल (24 नोव्हेंबर) ठिकठिकणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पावसाने एंट्री केली आणि सर्वांची धावपळ सुरू झाली.

काल संध्याकाळी वाळपई आणि इतर परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पणजी शहरातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, रात्री 11 च्या सुमारास पणजीत पावसाला सुरुवात झाली.

इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट पाहण्यासाठी जगभरातील सिनेरसिकांंनी हजेरी लावली आहे. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर सर्वजण आडोसा शोधू लागले.

एरव्ही सजावट आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटात न्हाऊन निघालेला इफ्फी परिसर पावसामुळे अचानकच शांत होऊन गेला. इफ्फीमध्ये मोठ्यामोठ्या लाइट्स आणि स्क्रीन्स लावलेल्या आहेत. पावसामुळे आवश्यक लाइट्स बंद करून त्या भिजू नयेत यासाठी त्यावर प्लास्टीस चढवण्यात आले. तसेच स्क्रीन्सवर ताडपत्री टाकण्यात आली.

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस म्हणजेच २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली असून या काळात ‘यलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT