Selaulim Canal Uge Dainik Gomantak
गोवा

Selaulim Canal: साळावली कालव्यातील सेतू असुरक्षित! पाइपवरून धोकादायक प्रवास; ग्रामस्थांत भीती

Selaulim Canal Uge: पुलावरून दुचाकी, चारचाकी वाहनांची येजा वाढल्यानंतर पडणाऱ्या ताणामुळे पाण्याच्या प्रवाहाला तोंड देण्याएवढे मजबूत बांधकाम केले जात आहे की नाही, याबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

Sameer Panditrao

सांगे: उगे ग्रामपंचायत क्षेत्रातील आणि तेमचीवाडा येथील श्री पाईकदेव मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या साळावली धरणाच्या असुरक्षित कालव्यामुळे प्रवास करणे धोक्‍याचे बनले आहे.

पूर्वी तेथे लहानसा पदपूल होता. तो जीर्ण झाल्यामुळे लोकांची सोय व्हावी म्हणून कालव्यात सिमेंटचे मोठे पाईप घालून त्यावर लहान सिमेंट पाईप बसवून लोकांची सोय व्हावी म्हणून तात्पुरती व्यवस्था करण्‍यात आल्‍याची माहिती साहाय्यक अभियंता कविता कुंदे यांनी दिली.

ग्रामस्‍थांच्‍या म्हणण्यानुसार, कालव्यात आता पाणी कमी असले तरी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाण्‍याचा प्रवाह जोरदार असतो. त्या प्रवाहात हा सिमेंट पाईपचा पूल सुस्थितीत राहणार याची खात्री आणि जबाबदारी जलसंपदा खाते घेण्यास तयार आहे काय?

या तात्पुरत्या पुलावरून दुचाकी, चारचाकी वाहनांची येजा वाढल्यानंतर पडणाऱ्या ताणामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाला तोंड देण्याएवढे मजबूत बांधकाम कंत्राटदाराकडून केले जात आहे की नाही, याबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

लाल शेरा मारलेल्‍या पाईप्‍सचा वापर

कंत्राटदाराने बांधकाम करण्यासाठी वापरलेले सिमेंटचे पाईप्‍सवर या आधी सार्वजनिक बांधकाम खात्याने लाल शेरा मारलेला आहे. अशा पाईपचा वापर करणे कितपत योग्य? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्‍थित केला आहे. या पुलावरून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेची हमी जलसंपदा खाते घेण्यास तयार आहे काय? असेही विचारले जात आहे. बांधण्यात आलेला हा तात्पुरता पूल असला तरी मजबूत आणि कायमस्वरूपी पूल कधी तयार करणार याची खात्री जलसंपदा खात्याने देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

SCROLL FOR NEXT