Old Goa tourist Dainik Gomantak
गोवा

Parking Problem: जुने गोवेत बेशिस्त पार्किंग

Parking Problem: पोलिसांचे दुर्लक्ष: वाहतूक नियमांचे उल्लंघन

दैनिक गोमन्तक

Parking Problem: जुने गोवेत अलीकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. शिवाय मार्गावर फोंडा, साखळी, माशेल परिसरातून येणारी वाहनेही याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते.

चर्च परिसरातील रस्त्यांवर दोन्ही बाजूला ‘नो पार्किंग’चे फलक लावले असूनही त्या फलकांच्या समोरच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. कोणीही वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. शिवाय पोलिसही गायब असतात, त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.

सोमवारी (ता.२५) मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आला. त्यात ख्रिसमसचा मोठा विकेंड आल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटकांचे आगमन झाले आहे. सोमवारी ख्रिसमसच्या दिवशी जुने गोवेत पर्यटकांनी गर्दी केली होती.

त्यादिवशीही नियंत्रणासाठी असलेले पोलिस गायब झाले होते, त्यामुळे अनेकांना बराच वेळ वाहतूक कोंडीचा त्रास झाला. त्यानंतर शुक्रवार, शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाहने रस्त्यावरच उभी केल्यामुळे वाहनांना हा रस्ता पार करण्यास किमान २० मिनिटे लागली.

रविवार ३१ रोजी विकेंड आल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी वाहतूक पोलिसांची गरज आहे. संबंधितांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे या भागातून प्रवास करणाऱ्यांचे मत आहे.

वाहतूक कोंडी!

जुने गोवे परिसरात बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असून रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे. शिवाय दैनंदिन स्वच्छतेचाही या भागात अभाव आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. स्वच्छतेचे दूत, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सर्कलजवळही कचऱ्यांच्या साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांनाही अस्वच्छतेला तोंड द्यावा लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT