All India Junior Badminton Tournament Dainik Gomantak
गोवा

अखिल भारतीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती, भारत यांची बाजी

ज्युनियर मानांकन बॅडमिंटन: सात्विक-वैष्णवी मिश्र दुहेरीत अजिंक्य

दैनिक गोमन्तक

पणजी: अखिल भारतीय ज्युनियर (19 वर्षांखालील) मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा व भारत राघव यांनी अनुक्रमे मुली व मुलांच्या एकेरीत विजेतेपद मिळविले. के. सात्विक रेड्डी व वैष्णवी खांडकेकर जोडी मिश्र दुहेरीत अजिंक्य ठरली. (Unnati, Bharat win in All India Junior Badminton Tournament held at Manohar Parrikar Indoor Stadium )

स्पर्धेतील अंतिम सामने गुरुवारी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम झाले. मुलांच्या दुहेरीत दिव्यम अरोरा व मयांक राणा जोडीने, तर मुलींच्या दुहेरीत ईशरानी बरुआ व देविका सिहाग जोडीने जेतेपदास गवसणी घातली. गोवा बॅडमिंन असोसिएशन व उत्तर गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटनेने भारतीय बॅडमिंटन संघटना आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने स्पर्धा घेतली.

Junior Badminton Tournament

उन्नतीची जबरदस्त मुसंडी

सहावी मानांकित उन्नती आणि पाचवी मानांकित देविका सिहाग या दोघीही हरियानाच्या. त्यांच्यातील लढत चांगलीच रंगली. उन्नतीने पहिला गेम 22-21 असा, तर देविकाने दुसरा गेम 21-14 असा जिंकल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. बीडल्ब्यूएफ सुपर 100 स्पर्धा जिंकणारी सर्वांत युवा भारतीय या विक्रमाची मानकरी उन्नती हिने निर्णायक गेममध्ये जबरदस्त मुसंडी मारली. 9-14 पिछाडीवरून तिने गेम 21-19 फरकाने जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत एक तास सात मिनिटे चालली.

हरियानाच्या खेळाडूंचे वर्चस्व

मुलांच्या एकेरीत हरियानाचा द्वितीय मानांकित भारत राघव याने तेलंगणचा प्रथम मानांकित प्रणव राव गंधम याला धक्का दिला. 42 मिनिटांत हरियानाच्या खेळाडूने 21-18, 21-12 फरकाने विजय प्राप्त केला. मुलींच्या दुहेरीत विजेती ठरलेली देविका सिहाग ही सुद्धा हरियानाची आहे. महिला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानल्यानंतर तिने आसामच्या ईशरानी हिच्यासह वर्चस्व राखले.

अंतिम निकाल

मुली एकेरी: उन्नती हुडा वि. वि. देविका सिहाग 22-21, 14-21, 21-19. मिश्र दुहेरी : के. सात्विक रेड्डी व वैष्णवी खडकेकर वि. वि. विग्नेश थाथिनेनी व श्री साई श्राव्या लक्कमराजू 17-21, 21-16, 21-16. मुलगे एकेरी: भारत राघव वि. वि. प्रणव राव गंधम 21-18, 21-12. मुली दुहेरीत : ईशरानी बरुआ व देविका सिहाग वि. वि. ज्ञानदा कार्तिकेयन व सानिया सिक्कंदर 16-21, 21-17, 21-18. मुलगे दुहेरी : दिव्यम अरोरा व मयांक राणा वि. वि. दर्शन पुजारी व अभिनव ठाकूर 21-18, 21-17

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT