Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: विजेचा धक्का की घातपात? कारापूर येथे अविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

Carapur Suspicious Death: कारापूर येथे एका अविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

कारापूर: कारापूर येथे एका अविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. वासंती रामा सालेलकर असे मृत महिलेचे नाव असून विजेचा 'शॉक' लागून तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घरात एकट्याच राहत होत्या

मिळालेल्या माहितीनुसार, वासंती रामा सालेलकर या कारापूर येथील एका बागायतीतील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मृत्यू नेमका कधी झाला आणि कशामुळे झाला, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. हा मृत्यू संशयास्पद मानला जात असला तरी, मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना प्रथमदर्शनी हा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाला असावा, अशी शक्यता वाटत आहे.

पोलीस तपास सुरु

दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. वासंती यांच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. पोलीस या संदर्भात अन्य शक्यतांचाही तपास करत आहेत. यामध्ये घरात कोणी येऊन गेले होते का? मृत्यूच्या वेळी घरात काय परिस्थिती होती? यांसारख्या बाबी तपासल्या जात आहेत. मृत वासंती सालेलकर यांच्या कुटुंबातील सदस्यांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करुन अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे.

वासंती सालेलकर यांचा मृत्यू नैसर्गिक होता की तो अपघात होता, याबद्दलचा अंतिम निर्णय पोलीस तपासाअंतीच जाहीर करतील. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining Auction: 'मेसर्स रॉयलाईन'कडून 12.68 लाखच मिळणार! खाण माल कमी असल्‍याचा कंपनीचा दावा मंत्रिमंडळाला मान्‍य

Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

Bombay High Court: पत्नीनं घरकाम न करणं म्हणजे 'क्रूरता' नाही, हायकोर्टाने पतीला लगावली चपराक; नेमकं काय प्रकरण?

खरी कुजबुज: बाबूंना नेमके काय पाहिजे?

Goa: गोव्यातील भाजी उत्पादनात मोठी वाढ; राज्याला आत्मनिर्भरतेकडे पाऊल; बेळगावातून येणाऱ्या आवकीत दरदिवशी तब्बल 40 टनची घट

SCROLL FOR NEXT