Student Acid Attack Dhargal Dainik Gomantak
गोवा

Acid Attack Goa: धक्कादायक! धारगळ येथे 16 वर्षीय विद्यार्थ्यावर फेकले अ‍ॅसिड; कॉलेजला जात असता अज्ञातांनी केला हल्ला

Goa Acid Attack: हा हल्ला एवढा भयावह होता की १६ वर्षीय मुलाचं ९०% शरीर यात जळलं असून त्याला तातडीने उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे

Akshata Chhatre

धारगळ: म्हापसा, धारगळ येथे सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सकाळी कॉलेजसाठी निघालेल्या वृषभ शेट्ये (वय.१७) यांच्यावर काही अज्ञात माणसांकडून अ‍ॅसिड अटॅक करण्यात आला. हा हल्ला एवढा भयावह होता की १७ वर्षीय मुलाचं ९०% शरीर यात जळलं असून त्याला तातडीने उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.

कुठे झाला हल्ला?

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कॉलेजला जाण्यासाठी थांबलेल्या मुलावर दोन मोटारसायकल चालकांनी अचानक अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात वृषभ शेट्येनामक पीडित मुलाची एक बाजू पूर्णपणे जळली आहे. हल्ल्यानंतर तो मदतीसाठी बराचवेळ मागणी करत होता मात्र कुणीही त्याच्या मदतीला धावून आलं नाही.

शेवटी एका माणसाने दया दाखवत वृषभ शेट्येला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा पंचनामा करत असून घडलेल्या हा धक्कादायक प्रकार पेडणे तालुक्यात पहिल्यांदाच घडला असल्याने स्थानिक यावर चिंता व्यक्त करत आहेत.

वृषभ शेट्ये कोण?

वृषभ शेट्ये हा कुठल्या किंवा कुठल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे याचा अजून अंदाज आलेला नाही. मात्र तो मदतीसाठी बराच वेळ याचना करत राहिला तरीही कोणी त्याला मदत केली नाही. हा विद्यार्थी नेमका कुठला हे माहिती नसलं तरीही तो धारगळचा रहिवासी असल्याची शक्यता आहे. रस्त्यावर किंवा चेक नाक्यांवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरा चांगल्या स्थितीत नाहीत त्यामुळे सरकारने त्वरित याकडे लक्ष देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा तपासून घ्यावीत आणि पीडितेला ज्ञाय द्यावा अशी मागणी होतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT