Goa Crime: प्रेमात विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, डिचोली पोलिसांकडून आरोपीला अटक

Bicholim: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डिचोली येथे उघडकीस आली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डिचोली येथून उघडकीस आली आहे. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, कारापूर-तिस्क येथील २२ वर्षीय संशयित आरोपी सचिन खोलकर याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन खोलकर याने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

मुलीच्या आईला ही बाब समजल्यानंतर त्यांनी तातडीने डिचोली पोलीस ठाण्यात संपर्क साधला आणि सचिन खोलकर विरोधात तक्रार दाखल केली.डिचोली पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तपासाला सुरुवात केली.

Goa Crime
Goa Plastic Waste: गोव्यात वाढते प्लास्टिक पर्यटकांमुळे! राज्याला येतोय 58 कोटी खर्च; अधिभार वसुलीसाठी विचार सुरु

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर, डिचोली पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवली आणि काही तासांतच संशयित आरोपी सचिन खोलकर याला अटक केली.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बालहक्क कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. डिचोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com