Chimbel villagers Dainik Gomantak
गोवा

Chimbel Kadamba Plateau: तळ्याजवळीलच जागा का हवी? ‘युनिटी मॉल’ला चिंबलवासीयांचा विरोध; आझाद मैदानावर ग्रामस्थ एकवटले

Kadamba Plateau Unity Mall protest: सरकारकडून झाडांना आग लावण्यात आली, २० मीटरचा रस्ता नसताना रस्त्याच्या नावाखाली झाडे कापण्यात आली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.

Sameer Panditrao

Chimbel Villagers Protest Unity Mall

पणजी: कदंब पठारावर प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ प्रकल्पाला चिंबल ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर पर्यावरणाशी खेळ करण्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, ग्रामस्थ गोविंद शिरोडकर यांनी आम्हाला तळे आणि पर्यावरण महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

चिंबल येथील तळ्याजवळ ‘आयटी पार्क’ प्रकल्प आणण्याचा २०१८ मध्ये प्रयत्न करण्यात आला होता. ‘आयटी पार्क’ हे फक्त निमित्त होते, त्यामागचा हेतू वेगळाच होता. जर खरोखर विकास साधायचा होता, तर सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले गेले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

‘आयटी पार्क’साठी पर्यावरणाचा विद्ध्वंस सुरू झाल्यावर स्थानिक आणि बिगर सरकारी संस्थांनी एकत्र येऊन विरोध केला. सरकारकडून झाडांना आग लावण्यात आली, २० मीटरचा रस्ता नसताना रस्त्याच्या नावाखाली झाडे कापण्यात आली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.

उच्च न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी या लढाईत विजय मिळवला होता यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

चिंबल तळे आणि आसपासच्या परिसराला २०२२ मध्ये ‘वेटलँड’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय कायद्यानुसार ‘वेटलँड’ला ५० मीटर ‘बफर झोन’ आणि ‘इन्फ्लुएन्शल’ जागेचे संरक्षण असले पाहिजे, असे ग्रामस्थांनी नमूद केले. मात्र, ‘युनिटी मॉल’साठी पर्यावरण आणि वन विभागाच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या नसल्याचे आपण पाहिल्याचे ग्रामस्थ गोविंद शिरोडकर म्हणाले.

ग्रामसभेचा एकमुखी विरोध

चिंबल ग्रामसभेने या प्रकल्पाला यापूर्वी स्पष्ट विरोध दर्शविला आहे. आम्ही एकमताने ठराव पारित करून या प्रकल्पाच्या विरोधात उभे राहिलो आहोत. आमच्या पर्यावरणावर अत्याचार होऊ देणार नाही, असा ठराव ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे.

भूसंपत्तीवर राजकीय स्वार्थाचा आरोप

बाजूला ६ लाख चौरस मीटर जागा उपलब्ध असताना, खंवटे यांना तळ्याजवळील पर्यावरणीय संवेदनशील जागा का हवी? असा थेट सवाल ग्रामस्थ गोविंद शिरोडकर यांनी केला आहे. आमदार रुडॉल्फ फर्नांडिस एकेकाळी ग्रामस्थांच्या पाठिशी होते. मात्र, आता ते खंवटे यांच्या बाजूने आहेत, असेही शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT