Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: 'मराठी न टिकवल्यास भवितव्य राहणार नाही'! वेलिंगकरांचे प्रतिपादन; लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

Subhash Velingkar: वेलिंगकर म्हणाले की,आपला हा लढा प्रत्येक तालुक्यात चालूच राहणार आणि तो लढा निर्णयक असा असून येत्या डिसेंबरपर्यंत मराठी राजभाषेचा दर्जा मिळवून देणारा असेल.

Sameer Panditrao

बार्देश: राज्यात मराठी न टिकवल्यास पुढील पिढीला भवितव्य राहणार नाही. मराठी ही संस्कृतीची भाषा आहे. म्हणून मराठी भाषिकांनी एकत्रितपणे लढ्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे गोवा समितीचे संस्थापक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.

खोर्ली म्हापसा येथील श्री सातेरी सभागृहात आयोजित मराठीप्रेमींच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर, साहित्यिक शंभू भाऊ बांदेकर, भाई मोये, नारायण राटवड, तुषार टोपले, डॉ. अनिषा येंडे, ॲड. रोशन सामंत, भाई पंडीत, उमेश म्हालदार व अभय सामंत उपस्थित होते.

पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले की,आपला हा लढा प्रत्येक तालुक्यात चालूच राहणार आणि तो लढा निर्णयक असा असून येत्या डिसेंबरपर्यंत मराठी राजभाषेचा दर्जा मिळवून देणारा असेल. समितीचे मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर म्हणाले की, मंदिरे, सोसायटी व इतर स्थानाचे इतिवृत्तांत मराठीतून लिहिले जातात.

मराठीतून प्राथमिक शाळांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.गोव्यात अनेक मराठी साहित्यिक आहेत. साहित्य लिहितात आणि वाचक त्याचे साहित्य वाचतात. प्रखंड मेळाव्याचे अध्यक्ष नारायण राटवड म्हणाले की, गोवा महाराष्ट्रापासून वेगळा असला तरी भौगोलिकदृष्ट्या एक आहे. आम्ही कोकणी भाषेचे दुष्मन नाही. पण सरकार मराठीला डावलण्याचा प्रयत्न करते.

ॲड. रोशन सामंत यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन ऋतुजा आर्लेकर यांनी केले. अमोघ लोटलीकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज राजवट परवडली'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

SCROLL FOR NEXT