CM in Sankhalim constituency  Dainik Gomantak
गोवा

साखळी मतदारसंघात मुख्‍यमंत्र्यांच्‍या अडचणी वाढल्या

दैनिक गोमन्तक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात त्‍यांच्‍याविरोधात सर्वपक्षीय एकच उमेदवार उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस हा या मतदारसंघात प्रमुख पक्ष असल्याने सर्वपक्षीय उमेदवार हा बहुधा याच पक्षाचा असणार आहे. इतर राजकीय पक्ष आपले वेगळे उमेदवार न उतरवता मुख्यमंत्र्यांच्या पराभवासाठी काँग्रेसच्‍या उमेदवाराला पाठिंबा देतील. मात्र कोणत्‍याही परिस्‍थितीत प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा पराभव करणे, हेच ध्‍येय विरोधकांनी नजरेसमोर ठेवले आहे. तरीसुद्धा काँग्रेस उमेदवार कोण असेल, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

विधानसभा निवडणुकीच्‍या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्‍यातील सर्व मतदारसंघांत राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मात्र समस्‍त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले आहे ते मुख्‍यमंत्र्यांच्‍या साखळी मतदारसंघाकडे. त्‍यांच्‍याविरोधात विरोधी पक्षांतर्फे कोण उतरणार, याची उत्‍सुकता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने अद्याप साखळी मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. आज (शनिवारी) किंवा उद्या (रविवार) हा उमेदवार जाहीर होण्‍याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत साखळी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले आहेत. आता तिसऱ्या वेळी ते निवडणूक मुख्यमंत्री म्हणून लढविणार असल्याने त्यांची बाजू सध्या तरी मजबूत आहे. त्‍यामुळे त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येऊन लढा देण्याशिवाय पर्याय नाही याची जाण सर्व विरोधी पक्षांना झालेली आहे. इतर मतदारसंघांत एकमेकांविरोधात लढलो तरी साखळी मतदारसंघात मुख्‍यमंत्र्यांच्‍या पाडावासाठीच लढा द्यायचाय, असा मतप्रवाह सर्व विरोधी पक्षांमध्ये झालेला आहे. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी साखळीत मगोचा उमेदवार न ठेवता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधी पक्षांचा एकच सर्वमान्य उमेदवार असावा असा विचार सर्व प्रथम मांडला होता. मगोने तृणमूल काँग्रेस पक्षाशी युती केल्याने तो पक्षही मगोच्या विचारांशी समरस असेल. आम आदमी पार्टीने साखळीत गेल्या निवडणुकीत उमेदवार उतरवला होता व त्याची अनामत रक्कमही जप्त झाली होती. पण यंदा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकच उमेदवार असावा या विचाराशी ‘आप’ने संमती दर्शवल्याचे वृत्त आहे.

‘आप’ने (AAP) अगोदर मनोजकुमार घाडी यांना साखळीतून उतविण्याचा निर्णय घेतला होता. घाडी यांनी प्रचारही सुरु केला होता. नंतर ‘आप’ने कामगार नेते पुती गावकर यांना पक्षात घेऊन साखळीत उतरविण्याचा निर्णय घेतला. पण मतदारसंघात सर्व्हेक्षण केल्‍यानंतर गावकर यांच्याबाबतचाही निर्णय मागे घेतला. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच ‘आप’ आपला निर्णय घेणार असल्याचे कळते. रिव्‍होल्‍युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनीही यापूर्वी मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढविण्‍याचा निर्धार केला होता. पण आता त्यांनीही हा निर्णय मागे घेऊन वाळपई व थिवी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्‍याचा निर्णय पक्का केला आहे. एकंदरीत एकच सर्वपक्षीय विरोधी उमेदवार असावा या निष्‍कार्षप्रत विरोधक आलेले आहेत.

सर्वपक्षीय काँग्रेसचा उमेदवार कोण?

साखळीत सर्वपक्षीय काँग्रेसचा (Congress) उमेदवार कोण असणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. या उमेदवारीसाठी साखळीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी, माजी आमदार (MLA) प्रताप गावस, माजी सरपंच प्रवीण ब्लेगन, माजी नगराध्यक्ष सुनीता वेरेकर, नगरसेवक राजेश सावळ, प्रदेश काँग्रेस सदस्य खेमलो सावंत व माजी पत्रकार महादेव खांडेकर यांनी दावा केला आहे. त्याचबरोबर उमेदवारी कुणालाही मिळाली तरी या खेपेला सर्वजण एकत्रित राहून एकजूटपणे या उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचा निश्‍‍चय त्‍यांनी केला आहे.

मुख्‍यमंत्र्यांचा प्रचार जोरात सुरू

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला गाव कोठंबी-पाळी येथे श्री चंद्रेश्वर देवाला नारळ ठेवून आपल्या प्रचारकार्याला प्रारंभ केला आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे (BJP) असंख्य कार्यकर्ते फिरताना दिसून येतात. भाजपने सरकारने विकासकामे केली, विविध सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळवून दिला तसेच असंख्य युवकांना रोजगार मिळवून दिलाय, हे त्‍यांच्‍या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री सावंत यावेळी विजयाची हॅट्‌ट्रिक करतील, असा विश्‍‍वास त्‍यांच्‍याबरोबरच त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT