Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Pharma Workers: फार्मा कर्मचाऱ्यांंकडून समस्यांचे निवेदन सादर! वेतनवाढीसाठी मंत्री मोन्सेरात यांची भेट

Verna Pharma Workers: असंघटित कामगार महासंघ गोवाचे अध्यक्ष कृष्णा पळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांना कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागणीसंदर्भात कामगार मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Verna Pharma Workers Demand

डिचोली: वेर्णा येथील फार्मा कंपनीच्या कामगारांच्या वेतनवाढीचा प्रलंबित प्रश्न त्वरित निकालात काढावा, अशी मागणी असंघटित कामगार महासंघ आणि फार्मा मजदूर संघाने केली आहे.

असंघटित कामगार महासंघ गोवाचे अध्यक्ष कृष्णा पळ आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांना कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागणीसंदर्भात कामगार मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

संबंधित कामगारांच्या मागण्या आणि इतर सर्व बाबी तात्काळ पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली, अशी माहिती असंघटित कामगार महासंघ गोवाचे अध्यक्ष कृष्णा पळ (डिचोली) यांनी दिली आहे.

फार्मा कंपनी कामगारांच्या मागणीसंदर्भात गोवा फार्मा मजदूर संघातर्फे फार्मा कंपनीच्या व्यवस्थापकांना पत्र देण्यात आले होते. कंपनीच्या व्यवस्थापकांनी चालढकल केल्याने कामगार संघटनांनी नंतर कामगार उपआयुक्त मडगाव यांना पत्र दिले. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून औद्योगिक विवाद अधिनियमानुसार मडगावच्या कामगार उपआयुक्तांकडे फार्मा कंपनी कामगारवर्गाचे प्रश्न प्रलंबित आहेत.

त्यामुळे कामगार नेते कृष्णा पळ यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात फार्मा मजदूर संघाचे अध्यक्ष कपिल माळकरी, गोवा फार्मा मजदूर संघ सरचिटणीस राजेश भाईगडे, गिरीश माईनकर, शिवापा हेबळ यांचा समावेश होता.

रोजगारवाढीसाठी प्रयत्न

व्यवस्थापन वाढीसाठी येणाऱ्या सर्व अडचणीसंदर्भात सविस्तर माहिती व सुधारणा कशी असावी. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामधील सुसंवाद, वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील सध्याची परिस्थिती उद्योग हित व श्रम हितानुसार गोवा राज्य कामगार आणि रोजगार विकसित व्हावा, अशी मागणी फार्मा मजदूर संघाचे अध्यक्ष कपिल माळकरी यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT