Goa Road  Dainik Gomantak
गोवा

MORTHINDIA: गोव्यातील घाट अन् हमरस्त्यांचे रुपडे पालटणार

केंद्र सरकारच्या रस्ता मंत्रालयाने गोव्यासाठी केली तरतुद

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यासाठी 2022-2023 या आर्थिक वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2228.78 कोटींची तरतूद केली आहे. त्यामूळे गोवा राज्यातील अनेक घाट अन् हमरस्त्यांचे रुपडे आता पालटणार आहे. कारण अरुंद रस्ते रुंद केले जाणार आहेत. तसेच या निधीमूळे रस्त्यांच्या दुरुस्तीला ही आता वेग येणार आहे.

(Union Ministry of Road Transport and Highways has allocated 2228.78 crore for Goa)

मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यांच्या दुरुस्तीमध्ये मडगाव ते कारवार हमरस्त्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये करमलघाटातील गुळे ते बेंदूर्डे चार पदरी रस्त्याच्या जमिन संपादनासाठी 79 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

माशे ते पोळे सीमेपर्यंत चार पदरी रस्ता बांधणीसाठी 177.35 कोटी रूपये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे अपघात प्रवण करमल घाटातील चार पदरी रस्ता आता प्रशस्त आणि वाहनचालकांसाठी अधिक उपयोगी ठरु शकणार आहे.

बेंदुर्डे ते गुळेपर्यंत हमरस्त्याशेजारील 14 किलोमीटर लांब क्षेत्रात रस्ता रूंदीकरणासाठी जमिन संपादन करण्यात येणार आहे. तसेच माशे ते पोळेपर्यंतच्या सुमारे 14 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 177.35 कोटी रूपयांची तरतूद 22-23 आर्थिक वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

SCROLL FOR NEXT