Smriti Irani Illegal Hotel Construction in Goa Dainik Gomantak 
गोवा

Goa Illegal Bar Row: स्मृती इराणी अन् त्यांची मुलगी गोवा रेस्टॉरंटच्या मालक नाहीत- HC

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी जोईश इराणी गोवा रेस्टॉरंटच्या मालक नाही- दिल्ली HC

दैनिक गोमन्तक

Smriti Irani Goa Illegal Bar: गोव्यातील रेस्टॉरंटच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी जोईश इराणी त्या रेस्टॉरंटच्या मालक नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच त्या रेस्टॉरंटच्या संबंधात तिने कधीही परवान्यासाठी अर्ज केला नाही. या प्रकरणाची शुक्रवारी (29 जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्याचा तपशीलवार आदेश आता समोर आला आहे.

न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही टिप्पणी केली. त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना बोलावले. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर हे समन्स पाठवण्यात आले आहे. इराणी यांनी या नेत्यांना 2 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीशी संबंधित ट्विट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले होते.उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले आहे की, 'गोव्यातील ते रेस्टॉरंट किंवा तिची जमीन स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीची नाही.'

बचाव पक्षाच्या लोकांनी (तीन काँग्रेस नेते) आणि इतर काही लोकांनी ही अफवा पसरवीली आहे. यासोबतच त्यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर वैयक्तिक टिकाही केली. असे करून स्मृती इराणी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, तथ्य जाणून न घेता मोठे आरोप केले गेले, ज्यामुळे स्मृती इराणी आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले असून पुढील सुनावणीत उत्तरासह हजर राहण्यास सांगितले आहे. दिवाणी खटला असल्याने मानहानीचे समन्सही बजावण्यात आले आहेत. आता पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे.

हे प्रकरण गोव्यातील सिली सॉल्स कॅफे आणि बारशी संबंधित आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आरोप केला होता की स्मृती इराणी यांच्या मुलीने गोव्यात रेस्टॉरंट चालवत 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट परवाना घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT