Union Minister Ramdas Athavale will be visit to Goa 
गोवा

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले येणार गोवा दौऱ्यावर

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी (ता. २०) दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार  आहेत. भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या (आठवले गट) सदस्य नोंदणीचा आढावा घेत पक्ष संघटना बळकटीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. ते या दौऱ्यादरम्यान आंबेडकर भवनाविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहेत.

वास्को येथे एमपीटीच्या विश्रामगृहात ते रविवारी रात्री ८ वाजता प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी पक्षाचे आशिया खंड प्रमुख राजेंद्र जाधव हेही उपस्थित राहतील.

मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी सकाळी १० वाजता आठवले यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, रिपब्लीकनचे प्रदेशाध्यक्ष सतीश कोरगावकर, केंद्रीय सहसचिव बाळासाहेब बनसोडे, खासदार विनय तेंडुलकर, निरीक्षक सुरेश बारसिंगे, घनश्याम चिरणकर, दिगंबर तेंडुलकर, श्याम आमोणकर, सूर्या साळकर, उमेश हसापूरकर आदी सहभागी होतील. सोमवारी दुपारी ३ वाजता वास्को येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतील, अशी माहिती पक्षाचे महासचिव सूर्या साळकर यांनी दिली.

आणखी वाचा:

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT