Goa BJP and MGP Dainik Gomantak
गोवा

मगोला सोबत घ्यायचे की नाही यावर मुख्यमंत्री म्हणाले...

बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत आलेले भाजप मंडळी आता नेमकी के पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa BJP and MGP: काल 10 मार्चला गोवा विधानसभा निवडणुकीचा निकल जाहीर झाला. निकालापूर्वी राजकीय पक्षांमध्ये अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. यावेळी मगो पक्षाने आपली बाजू स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि कॉंग्रेसमधील (Congress) नेत्यांची भेटदेखील घेतली. मगो कुणाला पाठिंबा देणार हे निकालानंतरच स्पष्ट करणार असल्याचे सुदिन ढवळीकरांनी (Sudin Dhavalikar) सांगितले होते.

काल मतमोजणी दरम्यान ज्यावेळी भाजप आघाडीवर आले त्यानंतर निकाल स्पष्ट होऊ लागला आणि कुणाचे सरकार आता गोव्यात येणार याचा अंदाज सर्वांना आला. यावेळी 3 विजयी अपक्ष उमेदवारांनी आपला जाहीर पाठिंबा भाजपला दिला ज्यामुळे भाजपकडील विजयाचा आकडादेखील वाढला. यानंतर मगोपनेही भाजपला आपले पाठिंब्याचे पत्र दिले. भाजपला मिळालेल्या 20 जागा, 3 अपक्ष आणि मगोपच्या 2 जागा, अशा आता भाजपकडे एकूण 25 जागा आहेत. अशाप्रकारे आता स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये मगोपलाही महत्वाचे स्थान असणार आहे. मात्र आता भाजपच्याच काही नेत्यांनी मगोच्या पाठिंब्याची भाजपला गरज नसल्याचे विधान केले आहे.

मगोची आम्हाला गरज नाही. माझ्यासह गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात यांचा मगोचा पाठिंबा घेण्यास स्पष्ट नकार असल्याचे मत भाजप आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी व्यक्त केल्यामुळे राजकारणात एकाच खळबळ उडाली.

मात्र यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, 'मगोला सरकारमध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय केंद्रीय नेतेच घेतील. इतर जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ. केंद्रीय निरीक्षक गोव्यात आल्यानंतर सरकार स्थापनेची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.' बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत आलेले भाजप मंडळी आता नेमकी के पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT