Union Budget 2023-24 Dainik Gomantak
गोवा

Union Budget 2023: अर्थसंकल्पाबाबत गोव्यातील जाणकार काय म्हणाले? CM सावंत यांनीही दिली प्रतिक्रिया

महत्वाची बाब म्हणजे करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे.

Pramod Yadav

Union Budget 2023: मोदी सरकारने त्यांच्या दुसऱ्या टर्मचा अखेरचा आणि 2023 -24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, पायाभूत सुविधा, महिला, करप्रणाली, रेल्वे अशा सगळ्या क्षेत्रांबाबत तरतूदी करण्यात आल्या आहेत.

महत्वाची बाब म्हणजे करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, भांडवली गुंतवणूकीत 33 टक्के वाढ करण्यासह एक कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंगकडे वळवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उद्योग आणि विविध क्षेत्रातील जाणकारांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

लोकांचा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

"आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींचे धेय्य सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याला अधोरेखित करणारा आहे. खऱ्याअर्थाने लोकांचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे आभार मानतो."

"अर्थसंकल्पात शेतकरी, उपेक्षित क्षेत्र, तरुण, एमएसएमई, ओबीसी महिला, उद्योजक, पगारदार यांच्या आशा-आकांक्षा समाविष्ट केल्या आहेत आणि ग्रीन-ग्रोथ, स्टार्टअप्स तसेच स्थानिक उत्पादन क्षेत्रांवरही मोठा भर देण्यात आला आहे."

"हा अर्थसंकल्प सर्वोत्तम आहे. गोव्यात स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल. समुद्री उत्पादनाच्या निर्यात करावरील कपात उद्योगांना फायदेशीर ठरेल," असे मत गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राल्फ डिसुजा यांनी व्यक्त केले आहे.

"पायाभूत सुविधा, शिक्षण, ग्रीन एनर्जी आणि शेतीसाठी पूर्णत: भविष्याचा वेध घेणारा आणि क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सकारात्मक असून, देशाच्या प्रगतीत योगदान देणार आहे." असे ढेम्पो समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास ढेम्पो म्हणाले.

"प्रगती आणि विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सितारमण यांनी सादर केला आहे. सर्वसमावेशक विकास, तळागाळात पोहोचण्यावर भर, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, सर्व प्रकारच्या उर्जेला प्रोत्साहन, ग्रीन एनर्जी आणि विकास, युवा शक्ती आणि अर्थ खाते अशा सात विभागात हा अर्थसंकल्प विभागाला आहे." असे गोवा सिमेन असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर म्हणाले.

रोजगार निर्मिती आणि प्रगतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे Assocham चे (Associated Chambers of Commerce and Industry of India) अध्यक्ष मानगिरीष रायकर म्हणाले.

'सकारात्मक अर्थसंकल्प असून, सर्वसमावेश प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. पन्नास वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज गोवा सरकारला पर्यटनसंबधित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरेल.' असे मत TTAG चे अध्यक्ष निलेश शहा यांनी व्यक्त केले.

'अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या क्षेत्रांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. मशीनवरील आयात कर कमी केल्याने त्याचा गोव्यासाठी फायदा होईल. याशिवाय डिजीलॉकर, सिंगल विन्डो अपडेशन यासारख्या सुविधा उद्योगांसाठी फायदेशीर ठरतील.' असे ICAI गोव्याचे अध्यक्ष गौरव केंकरे म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT