Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पावर 'या' दिग्गज विरोधी नेत्यांनी उधळली स्तुतीसुमने

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा संस्मरणीय अर्थसंकल्प सादर केला.
Union Finance Minister Nirmala Sitharaman
Union Finance Minister Nirmala SitharamanDainik Gomantak

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा संस्मरणीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर 80 कोटी लोकांना पुढील एक वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

दरम्यान, या अर्थसंकल्पावर (Budget) अनेक विरोधी नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, ज्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, त्यावरुन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाची काळजी घेतल्याबद्दल कार्ती चिदंबरम यांचे कौतुक केले. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरचे दिग्गज नेते आणि भाजप सरकारचे टीकाकार फारुख अब्दुल्ला यांनीही अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जाणून घ्या विरोधी पक्षाचे नेते काय म्हणाले...

Union Finance Minister Nirmala Sitharaman
Budget 2023 : एका अर्थमंत्र्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही... तर दुसऱ्यांच्या नावावर सर्वाधिक वेळा बजेटचा विक्रम...

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर ही माहिती दिली

पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार कार्ती चिदंबरम यांनी दिल्लीत अर्थसंकल्पाच्या समारोपप्रसंगी सांगितले की, 'अर्थसंकल्पाचा मोठा भाग हा राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि आर्थिक पाहणी अहवालाची पुनरावृत्ती आहे.' मात्र, त्यांनी याचे कौतुक करत या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करकपात स्वागतार्ह असल्याचे सांगितले. लोकांच्या हातात पैसा देणे हा अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Union Finance Minister Nirmala Sitharaman
Union Budget 2023: अमृतकालचा पहिला अर्थसंकल्प, 'भारतीय अर्थव्यवस्था चमकणारा तारा...'

अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी दिल्लीत अर्थसंकल्पाच्या समारोपाच्या वेळी केलेल्या वक्तव्यात म्हटले की, 'या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मदत केली गेली आहे, प्रत्येकाला काही ना काही दिले गेले आहे. अब्दुल्ला पुढे म्हणाले की, 'आम्ही दीड तास अर्थसंकल्प ऐकला.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com