Dog Death in Colva Dainik Gomantak
गोवा

अमानुषतेचा कहर! उकळलेले पाणी ओतलेल्या 'त्या' कुत्राच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत

पिल्लाच्या निधनाने सर्वत्र हळहळ; कारवाईची मागणी

Kavya Powar

Dog Death in Colva: जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बाँबचा स्फोट होऊन एका रानटी डुकराचे तोंड फुटल्याची घटना ताजी असतानाच कोलवा येथील एका पाळीव कुत्र्यावर अज्ञाताने उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला. यामध्ये त्या कुत्राच्या पिल्लाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. उपचार सुरू असताना पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

सदर घटनेची माहिती फिडॉल परेरा यांनी दिली. फिडॉल परेरा माजोर्डा येथे राहत असून त्या एक प्राणीप्रेमी आहेत. फिडॉल आजारी, जखमी आणि अपंग कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी ओळखल्या जातात.

कोलवा मध्ये जेव्हा पाळीव कुत्र्यावर जेव्हा उकळलेले पाणी ओतण्याचा प्रकार घडला तेव्हा फिडॉल यांनी याबाबत आवाज उठवत सदर घटनेचा निषेध केला.

या अमानुष कृत्य करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध कोलवा परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिल्लाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोपींवर पोलिसानी लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT