Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: कारच्या चाकाखाली चिरडून पर्यटक महिलेचा दुर्दैवी मृत्‍यू

Goa Accident Death: गोवा दर्शन करून परतताना काळाचा घाला

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: झुआरीनगर येथे झालेल्‍या अपघातात कारगाडीच्या चाकाखाली सापडून एक महिला जागीच ठार झाली. भाड्याच्या दुचाकीने आलेल्या पर्यटक जोडप्याने महामार्गावर नादुरुस्त झालेल्या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला.

कारला धडक दिल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेली महिला उसळून रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या चाकाखाली ती सापडली व तिचा जागीच मृत्यू झाला, तर चालक तिचा पती गंभीर जखमी झाला.

ही घटना आज दुपारी 12.30 वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. जीए - 06 - टी - 5276 क्रमांकाच्या दुचाकीवरून दिल्ली येथील हे दांपत्य वेर्णाहून दाबोळी विमानतळाकडे जात होते. 10 नोव्हेंबर रोजी ते गोव्यात आले होते व त्या दिवसापासून दुचाकी त्यांनी भाड्याने घेतली होती. आज दुचाकी मालकाकडे सुपूर्द करून ते विमानाने दिल्लीला जाणार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi: सावंतवाडीत 2 गटांत राडा! मारहाण, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न; पुणे, सिंधूदुर्गातील 9 जणांना अटक

Goa politics: खरी कुजबुज; विजय-मनोज युतीने लढणार?

Karun Nair Century: 6,6,6,4,4! 'अभी हम जिंदा है', करुण नायरचे गोव्याविरुद्ध दमदार शतक; निवड समितीचे वेधले लक्ष

Kidnapping Case: 'अभ्यासातून सुटका पाहिजे होती'! 13 वर्षीय मुलाने केला अपहरणाचा बनाव; गोव्यातील 3 खोटी प्रकरणे उघड

Ravi Naik: 'रवी नाईक' यांचे कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे! फोंड्यातील शोकसभेला तुडुंब गर्दी; गोमंत विभूषण पुरस्कार देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT