Unemployment  Dainik Gomantak
गोवा

लोलये पंचायत क्षेत्रात गाडेधारकांवर बेकारीची 'कुऱ्हाड'

‘साबांखा’ची नोटीस: कारवाईच्या भीतीने अनेकांचा व्यवसाय बंदच

दैनिक गोमन्तक

काणकोण: मडगाव- कारवार हमरस्त्यालगत असलेल्या काणकोण लोलये पंचायत क्षेत्रातील फिरते गाडेधारक, दुकानदार व घर मालकांना सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटिसा बजावल्याने सर्वांवर संक्रांत आली आहे. गाडेधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या आठवड्यात बांधकाम खात्याने त्यांना गाडे हटविण्याची नोटीस दिली होती, त्याची मुदत सोमवारी संपली. काही गाडेधारकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याने गाडे हटविण्यासाठी नोटीस दिल्यापासून गाडे बंद ठेवणे पसंत केले आहे.

लोलये पंचायत क्षेत्रात दापट,माड्डीतळप पोळे येथे सुमारे वीस फिरत्या गाडेधारकांना पंचायतीने व्यवसायास परवानगी दिली होती, असे सरपंच सचिन नाईक यांनी सांगितले. गेली 15 वर्षे व्यवसाय करणाऱ्यांना गाडे हटविण्याची नोटीस बांधकाम खात्याने दिल्याने ते सैरभैर झाले आहेत. 13 वर्षे दामट- माशे येथे रस आॅम्लेट,भाजीचा व्यवसाय करत आहे. तो बंद पडल्यास पोट भरणे कठीण आहे,त्यामुळे पुनर्वसन करावी,अशी मागणी भिकू पागी यांनी केली आह

चौपदरी रस्ता काम सुरू होईपर्यंत मुदत द्या !

चौपदरी रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत या गाडे धारकांना व्यवसायाची मुभा देण्याची मागणी सरपंच सचिन नाईक यांनी केली आहे. मडगाव- कारवार मार्गावर माशे ते पोळे पर्यंतच्या हमरस्त्यालगत गेली अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या गाडे धारकांनी चारपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू होईंपर्यंत व्यवसाय करण्याची मुदत द्यावी,अशी मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे.ज्या दिवशी चार पदरी रस्त्याचे काम सुरू होईल, त्यावेळी स्वतः हून गाडे हटवू,असे दापट- लोलये येथील एक गाडे धारक भिकू पागी यांनी सांगितले.

घरे, दुकान मालकानांही नोटिसा

तळपण ते पोळे पर्यंतच्या हमरस्त्यालगतची घर मालक व दुकान मालकांनाही सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटिसा बजाविल्या आहेत.मात्र, काही दुकानदार व घरमालकांनी याला आक्षेप घेतला आहे. गालजीबाग येथे काही घरांनाही नोटिसा बजावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT