Goa Fish Market: मासळीच्या दरात काही विशेष बदल नाही

दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढत चालला...
goa fish market, Goa fish market news updates
goa fish market, Goa fish market news updatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढत चालला असून सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय लोकांना आपला उदरर्निवाह करणे कठीण झाले आहे. इंधनाच्या दरवाढीचा प्रभाव अप्रत्यक्षपणे गोमंतकीय जनतेच्या खिशावर पडत आहे. मासळीचे दरही वाढले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात जे मासळीचे दर होते, त्यात काही विशेष बदल झालेला नाही. आज पणजी बाजारात बांगडे, तार्ली, वेर्ली, कोळंबी, इसवण, पापलेट, टोकी आदी विविध प्रकारची मासळी उपलब्ध होती. (Goa fish market news updates)

दिवसेंदिवस इंधनाच्या किमतीत वाढ होत असल्याने भाजीपाला, मासळी तसेच इतर वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्यावेळी इंधनाच्या दरांचा भडका उडतो त्यावेळी सर्व वस्तू महागतात किंवा महाग केल्या जातात हा आजवरचा इतिहास आहे.

goa fish market, Goa fish market news updates
गोवा समुद्रकिनारी बेकायदा 'इव्हेंट्स' करण्यास विरोध

मासळी दर प्रतिकिलो

तारली : 150

बांगडे : 150-200

टोकी : 100-150

समुद्री खेकडे : 200

लेपो : 350-400

कर्ली : 350

माणकी : 400

वेर्ली : 400

कोळंबी : 200-600(आकाराप्रमाणे)

पापलेट : 900-1000

इसवण : 750-800

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com