Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: ‘स्मार्ट सिटी’ची ऐशीतैशी...

Panjim Smart City: पणजीला धुळीने ग्रासले: खाणव्याप्त गावात असल्याचा नागरिकांना भास

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सांतिनेज परिसरातील मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे स्मार्ट रस्त्याचे काम गेले आठ-नऊ महिन्यांपासून सुरू आहे. दोन्ही बाजूला गटाराचे काम करण्यास वेग आला असल्याने येथील परिसरात धुळीमुळे खाणव्याप्त गावात गेल्यासारखा भास पणजीकरांना आता होऊ लागला आहे.

पणजी शहर परिसरातून सांतिनेजमधूनच टोंका येथे मुख्य भूमिगत मलनिस्सारण वाहिनी नेण्याचे काम सुरू झाले. पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू झाले, पण ते अजूनपर्यंत संपण्याचे काही नाव घेत नाही. वाहिन्यांचे चेंबरच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. सध्या सांतिनेजमधील विवांता हॉटेल सिग्नल चौकापासून टोंका आणि वेलनेस मेडिकलपासून ते मधुबन सोसायटी रस्त्याच्या बाजूच्या गटारांचे काम सुरू आहे.

गटाराचे काम सुरू असल्याने खोदकाम केल्यानंतर काढलेल्या मातीने अर्धा रस्ता व्यापला आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे माती रस्त्यावर पसरली आहे. दुचाकीस्वारांना येथून ये-जा करताना नकोसे झाले आहे. महानगरपालिकेने इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडकडे (आयपीएससीडीएल) शहराचा ताबाच दिल्यासारखे आता दिसत आहे.

सध्या शहरात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे जोरदार सुरू आहेत, तर दुसरीकडे काही रस्ते स्मार्ट करण्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे पणजीत वाहनांना पार्किंगला जागा मिळत नाही. त्यामुळे रस्त्यांवर एका बाजूला दुहेरी पार्किंग केलेली वाहने दिसतात. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे.

सांतिनेज परिसरात प्रवास नकोसा

सध्या दररोज सांतिनेज परिसरातून ये-जा करण्याशिवाय पर्याय नसलेल्यांना प्रवास नकोसा झाला आहे. या भागातील रस्त्याच्या बाजूला उभे केलेले वाहन काही मिनिटांतच धुळीने माखलेले दिसते. मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम नगरविकास प्राधिकरणाकडे (जीसूडा) आहे. कामाची गती दिसत असली तरी हे काम आणखी किती महिने चालणार हे काही सांगता येत नाही.

स्मार्ट सिटीची कामे करताना सुरवातीला मध्यवर्ती ठिकाणांऐवजी बाहेरील रस्त्यांचे व मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करून घ्यायला हवे होते. त्यानंतर हळूहळू शहरातील एका-एका भागातील काम हाती घ्यायला हवे होते. सध्या शहरात कोणत्याही बाजूला गेलात तरी खोदकाम सुरूच असल्याचे दिसते. हा सर्व प्रकार अनियोजनामुळेच असल्याचे स्पष्ट दिसते. आपण महानगरपालिकेच्या बैठकीत वारंवार हा प्रश्‍न उपस्थित केला, पण कोणालाच त्याचे काही पडलेले नाही. आता मळ्यातही खोदकाम सुरू झाल्याने येथे वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
- उदय मडकईकर, माजी महापौर तथा नगरसेवक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT