Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Fraud Case: गोव्यात SIT करतेय तपास तीच वादग्रस्त जमीन विकली; हरियाणातील इसमाला एक कोटीचा गंडा

Fraud Case: गोव्यातील वादग्रस्त जमीन स्वतःची असल्याचे सांगून आरोपींनी पैसे घेतले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Pramod Yadav

Goa Fraud Case

गोव्यात जमीन देण्याचे आमिष देत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुग्राम येथील सेक्टर 29 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोव्यातील वादग्रस्त जमीन स्वतःची असल्याचे सांगून आरोपींनी पैसे घेतले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सिटी सेंटर एमजी रोड येथील रहिवासी कृष्ण कुमार अंतिल यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. कृष्ण कुमार केरळचा रहिवासी असलेल्या लेंचू येथील जेम्स व त्याच्या एका साथीदारासह भेटले होते.

संशयित आरोपी 2 जून 2023 रोजी त्याच्या कार्यालयात आला आणि त्याने गोव्यातील आसगाव येथील जमीन विक्री करण्याची किंवा विकसित करण्यासाठी ऑफर दिली. आरोपीने खात्री दिली की तो जमिनीचा कायदेशीर मालक आहे. आरोपींनी संबधित जमीन त्याचीच असल्याचा विश्वास कृष्ण कुमार यांना दिला.

जमीन नावावर करण्याच्या बदल्यात त्याने एक कोटी रुपये घेतले. बदल्यात कोणतीही कागदपत्रे न दिल्याने त्यांना संशय आला.

कृष्ण कुमार अंतिल यांनी संबधित जमिनीची स्वत:च चौकशी सुरु केली. आसगाव ग्रामपंचायतीला संपर्क साधून त्यांनी जमिनीची कागदपत्रे मिळवली असता, संबधित जमीन वादग्रस्त असून त्याबाबत एसआयटी चौकशी करत असल्याचे समोर आले.

गोव्यातील जमीन हडप प्रकरणांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

अधिक तपासात संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून अलीकडेच त्याला अंमलबजावणी विभागाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. गोवा पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

Rohit Sharma: फायनलचा थरार... भारतीय महिला संघाला सपोर्ट करण्यासाठी 'मुंबईचा राजा' मैदानात Watch Video

SCROLL FOR NEXT