UK woman Emma Louise Died In Goa 
गोवा

युकेतील महिलेचा गोव्यात कशामुळे मृत्यू झाला? शवचिकित्सा अहवालानंतर पोलीस म्हणाले...

पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर गुरुवारी शवचिकित्सा अहवाल समोर आला.

Pramod Yadav

UK woman died in Agonda Goa: युके येथील विदेशी महिलेचा मंगळवारी रात्री आगोंद किनाऱ्यावर मृतदेह आढळला होता. महिलेचे निधन डोक्याला व स्पायनल कॉर्डला दुखापत झाल्याने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी रात्रीच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर गुरुवारी शवचिकित्सा अहवाल समोर आला.

एमा लुईस असे या ब्रिटीश महिलेचे नाव असून, उंचावरून पडल्याने त्यांच्या डोक्याला व स्पायनल कॉर्डला दुखापत झाली, असे अहवालात म्हटले आहे.

शवविच्छेदन अहवालात महिलेच्या मणक्याचे फ्रॅक्चर आणि मेंदूतील रक्तस्त्राव (अंतर्गत रक्तस्त्राव) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला पडल्यानंतर ती बेशुद्ध पडली त्यानंतर बराचवेळ तिच्याकडे लक्ष न दिल्याने तिचा मृत्यू झाला, असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

पण, महिला कशामुळे खाली पडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मृतदेह ताब्यात घेण्यात आला त्यावेळी महिलेच्या शरिरावर कोणतीही इजा झाल्याचे दिसून आले नव्हते. तसेच, तिच्या वस्तू, मोबाईल हे सर्व घटनास्थळी आढळून आले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

ब्रिटीश दूतावासाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, असे काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

मात्र, 'बायलांचो एकवट'च्या प्रमुख आवडा व्हिएगश यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी पोलिस प्रमुखांकडे केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT