Uber taxi  Dainik Gomantak
गोवा

Uber Taxi in Goa: गोव्यात उबर टॅक्सी सेवा सुरू होणार

मोपा विमातळावरून पिक अप-ड्रॉप सेवा देण्याची तयारी

Akshay Nirmale

Uber Taxi Service will start in Goa: गोव्यात लवकरच उबर टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे कुणीही माहिती दिलेली नाही. तथापि, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पिक अप आणि ड्रॉप ऑफ सेवा उबर पुरविणार असल्याची माहिती आहे. हॉटेल ते विमानतळ आणि विमानतळ ते हॉटेल अशी ही सेवा असणार आहे, असे कळते.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे. येथे ओला, उबर सारख्या अॅप आधारीत टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत चर्चा होत आल्या आहेत. तथापि, स्थानिक टॅक्सी चालकांचा या सेवांना कायम विरोध राहिला आहे.

तसेच गोव्यात अद्याप स्थानिक टॅक्सी चालकांचे अनेक प्रश्न सुटायचे आहेत. मोपा विमानतळावर स्थानिकांना स्वतंत्र टॅक्सी काऊंटर हवे आहे.

त्यामुळे उबर सेवा राज्यात सुरू होत असेल तर त्यावर स्थानिक टॅक्सी चालक, मालकांची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्याबाहेरील पर्यटक मात्र ओला, उबेर टॅक्सी सेवा असली पाहिजे, या मताचे आहे.

त्यातून पर्यटकांकडे वाहतूक सेवेचा एक पर्याय नेहमी राहिल, तसेच स्पर्धेमुळे पर्यटकांचा फायदा होईल, असेही बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT