पुणे येथील रहिवासी तुषार चोरघे आणि नीरज गवारे या दोन शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना भेट दिली  Dainik Gomantak
गोवा

Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांना मानाचा मुजरा; महाराष्ट्रातील दोन तरुण अलिबागपासून कन्याकुमारीपर्यंत पायी चालणार

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दोन तरुणांनी अलीबाग ते कन्याकुमारी असा 1500 कि.मि. प्रवास पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: आवड असली कि सवड मिळते आणि हीच सवड मग काय काय करायला भाग पाडेल सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दोन तरुणांनी अलीबाग ते कन्याकुमारी असा 1500 कि.मि. प्रवास पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील तुषार चोरघे आणि निरज गवाणे या तरुणांनी अलिबागहून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. काल त्यांचे वास्कोत चिखलीला आगमन झाले. चिखली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.

(Two youths will walk from Tarun Alibaug to Kanyakumari to greet Chhatrapati Shivaji Maharaj)

पुणे येथील रहिवासी तुषार चोरघे आणि नीरज गवारे हे दोन शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना भेट देण्यासाठी म्हणून पाच राज्यांच्या पदयात्रा दौऱ्यावर निघाले आहे. चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या दोघांनीही मंगळवारी भेट दिली असता मुरगाव हिंदू समाजाचे सचिव श्री संतोष खोर्जुवेकर, सहसचिव श्री शैलेंद्र गोवेकर, सह खजिनदार श्री दामू कोचरेकर व केंद्रीय समितीचे सदस्य श्री चंद्रकांत गवस यांनी त्यांचे स्वागत केले.

मंगळवारी रात्री ते चिखली येथील श्री सातेरी देवस्थान परिसरात आश्रय घेणार असून बुधवारी सकाळी मुरडेश्वर कर्नाटक येथे जाण्यासाठी ते प्रवासाला सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या जेवणाची व्यवस्था श्री शैलेंद्र गोवेकर यांनी केली आहे. पायी चालत ते आपला प्रवास करीत असून दिवसाला 25 ते 30 कि.मी. पर्यंतचा प्रवास करतात.गुगल मॅपवरून ज्या ठीकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत ते ठीकाण ते दोघे पायी चालत गाठतात.

नियोजित स्थळी काही ठीकाणी त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था समाजसेवकांतर्फे केली जाते. तंबू उभारून किंवा एखाद्या मंदिरात ते आपला रात्रीचा मुक्काम करत असल्याचे तुषार चोरघे यांनी सांगताना प्रवासा त काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

SCROLL FOR NEXT