Peddem Accident Dainik Gomantak
गोवा

Peddem Accident: पेडे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात; दांपत्यासह तरूण जखमी

भरधाव दुचाकीवरील तरूणाचे नियंत्रण सुटले

Akshay Nirmale

Peddem Accident: गोव्यातील पेडे येथे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दांपत्य जखमी झाले आहे. दांपत्त्यापैकी गाडी चालवत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून गाडीवर पाठीमागे बसलेल्या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.

एक तरूण भरधाव वेगात अॅक्टिव्हा ही दुचाकी चालवत होता. त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी समोरील गाडीवर जाऊन जोरात आदळली. साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. पेडे येथील वाहनांची नेहमी वरदळ असलेल्या जंकश्न जवळ हा अपघात झाला.

अॅक्टिव्हाने GA03AL 2822 या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघतानंतर दोन्ही दुचाकींवरील प्रवासी रस्त्यावर पडले. जखमींना रूग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. गर्दीतीलच लोकांनी रस्त्यावर पडलेल्या जखमींना उचलून बसवले, त्यांना पाणी दिले आणि त्यांना रूग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली. यावेळी येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT