Two Trawler from Karnataka seized in Goa (संग्रहित फोटो) Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रात परप्रांतीय मच्छीमारांनी अवैधरित्या घुसखोरी

बाणावलीतील समुद्रात कारवाई, मच्छीमार बांधवांची पोलिसांना मदत, कर्नाटकातून आलेले दोन ट्रॉलर जप्त

दैनिक गोमन्तक

सासष्टी: दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रात (goa banavali beach) परप्रांतीय मच्छीमारांनी अवैधरित्या घुसखोरी करून मासेमारी केल्याप्रकरणी काल सोमवारी बाणावलीतील स्थानिक मच्छीमार (Fisherman) बांधवांच्या मदतीने साहाय्याने मत्स्यव्यवसाय विभाग आणि बेतुल किनारपट्टी सुरक्षा पोलिसांनी (Goa Police) कारवाई करीत कर्नाटक राज्यातून आलेले दोन ट्रॉलर जप्त केले. या कारवाईत घुसखोरी केलेल्या एकूण अकरा मच्छीमारांना ताब्यात घेण्यात आले आहे. परप्रांतीय मच्छीमाऱ्यांकडून गोव्यातील समुद्रात मासेमारी करण्यात आल्याने स्थानिक माच्छीमार बांधवांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, बाणावलीतील मच्छीमार आज सकाळी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. मासेमारी करत असताना या स्थानिक मच्छीमारांना खोल समुद्रात परप्रांतीय मच्छीमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक मच्छीमारांनी त्वरित बेतुल किनारपट्टी सुरक्षा पोलिस तसेच मत्स्यव्यवसाय विभागाला या प्रकराची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित समुद्र किनाऱ्यावर येऊन स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात गेले आणि कर्नाटक राज्यातून आलेले दोन ट्रॉलर जप्त केले. एकूण अकरा मच्छीमारांना ताब्यात घेतले. या सर्व मच्छीमाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

गोव्यातील समुद्रात होणाऱ्या या घुसखोरीवर रोख लावण्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या या अकराही परप्रांतीय मच्छीमारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी केली.

दोन ते तीन टन मासेमारी

मासेमारीचा हंगाम सुरू होताच परप्रांतीय मच्छीमार मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोव्यातील समुद्रात येऊन मासेमारी करतात. परप्रांतीय मच्छीमारांकडून घुसखोरी करण्यात येत असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना याचा फटका बसत आहे. आज कर्नाटक राज्यातून दोन ट्रॉलर आले होते. त्यांनी अंदाजे 2 ते 3 टन इतकी मासेमारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT