Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

Goa Crime: पोलिस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र, पाटल्या, तोडे असे मिळून लाखो रुपयांचे दागिने हातोहात पळविले

गोमन्तक डिजिटल टीम

Bastora Junction Crime

म्हापसा : आम्ही पोलिस अधिकारी आहोत. थोड्या वेळापूर्वीच काही अंतरावर मोठी लूट झाली आहे. त्यामुळे अंगावरील दागिने सांभाळा, अशी बतावणी करून दोघा भामट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र, पाटल्या, तोडे असे मिळून लाखो रुपयांचे दागिने हातोहात पळविले. ही घटना बस्तोडा जंक्शनवर घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी नंदकुमार रायकर (७६, रा. कारोना-हळदोणा) हे फिर्यादी आहेत. फिर्यादी व त्यांची पत्नी हे म्हापशाहून हळदोणेच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. यावेळी दोघे गाडीवरून या दांपत्याजवळ आले व तुम्ही ट्रॅफिक सिग्नल मोडला (जंप) आहे. तुमचे लायसन्स दाखवा, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने लायसन्स घरी आहे असे सांगितले.

त्यानंतर या तोतया पोलिसांनी पुढे मोठी लूट झाली आहे. त्यामुळे अंगावरील दागिने काढून पिशवीत काढून ठेवा अशी सूचना केली. त्यानुसार फिर्यादीच्या पत्नीने दागिने काढून पिशवीत घातले असता हे दागिने घेऊन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. चोरांनी फिर्यादीच्या पत्नीचे मंगळसूत्र, तोडे, पाटल्या हातोहात पळविले.

सीबीआयवाले पोलिस!

दोघेही संशयित हे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते. ते साध्या वेशातच होते. मात्र ते हिंदी भाषेत बोलत होते. आम्ही सीबीआयवाले पोलिस आहोत, असे भासवून तोतया पोलिसांनी या दांपत्यास गंडविले. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३०३ व ३(५) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa London Flight: लंडन-गोवा विमानसेवा रद्द! Air Indiaचा निर्णय; अहमदाबाद, अमृतसर सेवा होणार सुरु

Arpora: भटक्या गुरांची झुंज, दुचाकीला बसली जोरदार धडक; हणजूणच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

Verca: 'शाळा का चुकवली'? पालक ओरडल्याने 2 विद्यार्थी गोव्यातून पळाले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले भुसावळमध्ये

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

SCROLL FOR NEXT