Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: चिंचणीतील चोरीप्रकरण; दोघे संशयित ताब्‍यात

यातील सुरेंद्र गौतम (३०) याला पुणे येथून अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: चिंचणी येथील सराफी दुकानातील चोरीप्रकरणी महत्त्वाचे धागे पोलिसांना सापडले असून सध्‍या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. यातील सुरेंद्र गौतम (३०) याला पुणे येथून अटक केली.

संशयिताला न्‍यायालयात उभे केले असता, त्‍याला अधिक चौकशीसाठी सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्‍यात आली. या चोरीप्रकरणी दुसऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. सध्‍या त्‍याची चौकशी चालू आहे.

गेल्‍या मंगळवारी चिंचणी येथील झहीर गोल्‍ड ॲण्‍ड ज्‍वेलर्स दुकानात चोरी झाली होती. त्‍यात सोन्‍याचे व चांदीचे मिळून दहा लाखांचे दागिने लंपास करण्‍यात आले होते. दुकानाच्‍या खिडकीचे ग्रील्‍स तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. दुकानातील सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

Horoscope 2026: घर घेण्याचं स्वप्न साकार होणार, जमीन व्यवहारातून मिळणार अफाट पैसा; 'या' राशीवर शनिदेवाची विशेष कृपा

डोनाल्ड ट्रम्पच्या डिनर सोहळ्यात गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा धक्कादायक 'मेनिफेस्टो' उघड; 'इराणी एजंट' विधानानं खळबळ; काय म्हणाला नेमकं?

GCA One Day Trophy: 'चौगुले'च्या शिवेंद्रचे 'मॅचविनिंग' दीडशतक, 'धेंपो'च्या अभिनवची शतकी खेळी व्यर्थ, साळगावकरचीही आगेकूच

Goa Heatwave: उकाड्याने नागरिक हैराण; जलस्रोतांवर वाढली वर्दळ, 'धोंड तळी' बनली आकर्षणाचे केंद्र

SCROLL FOR NEXT