Goa Colvale Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police Recovers Motorcycle: चोरीला गेलेल्या दोन बुलेट मोटरसायकल हस्तगत; कोलवाळ पोलिसांची कामगिरी

सीसीटीव्ही फुटेज हाती; चोरट्यांचा शोध सुरू

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police Recovers Motorcycle: कोलवाळ पोलिसांनी चोरीला गेलेल्या दोन बुलेट मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. 17एप्रिल रोजी पार्किंगमधून या बुलेट दुचाकी चोरीला गेल्या होत्या.

या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलिसांनी हे फुटेज जारी केले आहे. त्यावरून दोघा बुलेट चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी म्हणाले की, GA-11-F-1212 आणि GA-06-Y-0653 क्रमांकाच्या दोन बुलेट मोटरसायकल पोलिसांना गस्त घालत असताना कोलवाळ पुलाशेजारी पार्किंगजवळ सापडल्या.

त्या पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आल्या आहेत. यातील एक बुलेट म्हापशातून चोरीला गेली होती.

याबाबत गुन्हा नोंद झाला होता. त्याचा तपास सुरू होता. चोराला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक सोमनाथ महाजिक, पोलिस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर, हेड कॉन्स्टेबल महादेव परब आणि इतर असे पथक नेमले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

Horoscope: शनिवार 'या' राशींसाठी ठरणार लकी! वैवाहिक जीवनात फुलणार प्रेमाचे रंग; होणार मोठी भरभराट

SCROLL FOR NEXT