Goa Accident Dainik Goamantak
गोवा

Goa Accident: वाळपईत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे गंभीर

Goa Accident: वाळपई परिसरात आज बुधवारी झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांत दोघेजण गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

Goa Accident: वाळपई परिसरात आज बुधवारी झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांत दोघेजण गंभीर जखमी झाले. रेडेघाट-सत्तरी येथे दुचाकी व बोलेरो पिकअप यांच्यात अपघात झाला. बोलेरो पिकअप चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन तो घटनास्थळावरून पसार झाला. यात दुचाकीस्वार साईप्रसाद नाईक रा.मासोर्डे सत्तरी हे गंभीर जखमी झाले.

वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेतली आहे. दरम्यान साईप्रसाद हा गंभीर जखमी झाला असून त्याला गोमॅकोत दाखल केले आहे. बोलेरो पिकअप ही वाळपई येथे खान नामक व्यक्तीची असून दूध पुरवठा करते.

दरम्यान, दुसरा अपघात नाणूस वाळपई येथे सॅंट्रो कार व ॲक्टीव्हा स्कूटर यामध्ये झाला असून त्यात स्कूटर चालक गजानन देसाई (२२) रा. अडवई सत्तरी येथे गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

प्राप्त माहितीनुसार सॅंट्रो कार ही वाळपईतून नाणूस येथे पोहचली होती, तर स्कूटर अडवईहून वाळपईच्या दिशेने जात होती.तेव्हा हा समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यात गजानन सॅंट्रोवर उसळला, त्यामुळे डोके कारच्या समोरील काचेवर आदळले, तर पायालाही मोठी जखम झाली आहे.

तातडीने त्याला गोमेकॉत पाठविण्यात आले. सॅंट्रो कार ही महाराष्ट्र पासिंगची असून नाणूस येथील एका व्यक्तीची असल्याचे कळते. दरम्यान, दोन्ही अपघातांचा तपास वाळपई पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई झिंगू गावकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT