Arrest Canva
गोवा

Goa Drugs Case: सापळा रचून पोलिसांनी नागोवा येथे केला आठ लाखांचा गांजा जप्त! ओडिशातील दोघांना अटक

Goa Crime: हणजूण पोलिसांनी ड्रग्स तस्करीअंतर्गत छापा टाकून ८.१७ लाखांचा ८.१७५ किलोग्रॅम गांजा जप्त केला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: डायसवाडा-नागोवा येथे हणजूण पोलिसांनी ड्रग्स तस्करीअंतर्गत छापा टाकून ८.१७ लाखांचा ८.१७५ किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित संजीब हपाना मारंदी (२६) व दीपिका धोबुनी पोलाई (१८) या ओडिशातील दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी केली.

डायसवाडा येथील चॅपेलजवळ ड्रग्सचा विक्रीव्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित घटनास्थळी येताच त्यांना पोलिसांनी पकडले. झडतीवेळी संशयित संजीब मारंदी याच्याजवळ ४.१०७ किलोग्रॅम तर संशयित दीपिका पोलाई हिच्याकडे ४.०६८ किलोग्रॅम गांजा सापडला. या गांजाची किंमत ८ लाख १७ हजार ५०० रुपये आहे. संशयितांकडून हा गाजा जप्त करून त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा नोंद केला व त्यांना अटक केली.

पोलिस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सूरज गावस यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक लिशा खरबे, कॉन्स्टेबल संदेश पेडणेकर, अनिकेत पेडणेकर, प्रशांत परब, गुरुदास सांगेलकर, प्रज्ञा साळगावकर या पथकाने ही कामगिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT