Two more corona victims died in the state
Two more corona victims died in the state 
गोवा

गोव्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६९० वर पोहचली आहे. आज दिवसभरात १६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर १२८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यात तेराशे सहासष्ट सक्रिय रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट ९५.८४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

आज ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये पेडणे येथील ८२ वर्षीय पुरुष आणि केपे येथील ७२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील एक मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि दुसरा कुडचडे येथील आरोग्य केंद्रात झाला आहे. कुडचडे येथील रुग्णाला मृतावस्थेतच आणण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी करताना या रुग्णाची करण्यात आलेली कोरोना पडताळणी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. आरोग्य खात्याने रुग्णांच्या सोयीसाठी सर्वती उपाययोजना हाती घेऊन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २२३ खाटा वापरासाठी उपलब्ध आहेत, तर दक्षिण गोव्यात ६० इतकी खाटांची संख्या असून सध्या ४३ खाटा उपलब्ध आहेत. आज दिवसभरात १२६ लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला, तर ४३ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात दोन हजार अट्ठेचाळीस इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, डिचोली आरोग्य केंद्रात ३१ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात २६ रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात ४० रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात १०२ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात ११३ रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ३८ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात ९३ रुग्ण, काणकोण आरोग्य केंद्रात ३९ रुग्ण उपचार घेत आहेत.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT